हिंगोली (Hingoli Water supply) : १ सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे पाणी पुरवठ्याची पाईप लाईन वाहून गेली होती. त्याच्या दुरूस्ती कामानंतर आता हे काम पूर्ण होऊन १४ सप्टेंबर रोजी सिद्धेश्वर धरणातून पाणी पुरवठा (Hingoli Water supply) पूर्ववत सुरू झाल्याने हिंगोलीकरांचा १४ दिवसाचा वनवास संपला आहे.
हिंगोली शहराला सिद्धेश्वर धरणातून (Siddheshwar dam) पाणी पुरवठा केला जातो. गांगलवाडी शिवारात सिद्ध नदीला १ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा पूर येऊन पाणी पुरवठ्याची पाईप लाईन वाहून गेली होती. त्यामुळे हिंगोली शहरात निर्जळीचा सामना करावा लागला. पहिल्यांदा अशा अतिवृष्टीत पाणी पुरवठ्याची बिकट अवस्था हिंगोलीकरांनी अनुभवली. हिंगोली नगर पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या नेतृत्वाखाली (Hingoli Water supply) पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने दिवसरात्र एक करून सिद्ध नदीजवळ नवीन पाईप लाईन टाकली. चाचणीचे काम सुरू असतानाच पाणी पुरवठ्याचा वॉल फुटल्याने पुन्हा निर्जळीला सामोरे जावे लागले.
परभणी येथून कसाबसा वॉल उपलब्ध झाल्यानंतर १३ सप्टेंबर रोजी बसविण्यात येऊन काँक्रीटीकरण करण्यात आले. १४ सप्टेंबर रोजी (Siddheshwar dam) सिद्धेश्वर धरणातून पाणी पुरवठा सकाळी सोडण्यात येऊन चाचणी घेण्यात आली. पाईप लाईन व वॉलचे काम दर्जेदार झाल्याने डिग्रस कर्हाळे येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पुरवठा शुद्धीकरण करून हिंगोली शहरातील जलकुंभात सोडण्यात आला. तब्बल १४ दिवसापासून शहरवासीय निर्जळीला सामोरे जात असताना आता पाण्याचा वनवास संपला आहे. त्यामुळे शहराला ठरलेल्या रोटेशन नुसार सुरळीत पाणी पुरवठा सुरू झाला आहे.
चार दिवस बंद होता वीज पुरवठा
१ सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे जवळपास चार दिवस वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे (Siddheshwar dam) सिद्धेश्वर धरणातून हिंगोलीला पाणीपुरवठा (Hingoli Water supply) सोडण्यात आला नव्हता. महावितरण तर्फे दुरूस्तीचे काम चार दिवसानंतर पूर्ण झाल्यावर जेव्हा सिद्धेश्वर येथून पाणी पुरवठा सोडण्यात आला तेव्हा कुठे गांगलवाडी शिवारातील पाईप लाईन अतिवृष्टीने वाहून गेल्याचे लक्षात आले. याच दरम्यान सिद्ध नदीचा पूर ओसरल्या नंतर नगर पालिका पाणी पुरवठा विभागाने ५ सप्टेंबर पासून दिवसरात्र करून दुरूस्तीचे काम केल्यामुळे हिंगोली शहराचा पाणी पुरवठा (Water supply) आता पूर्ववत झाला आहे.