दुरूस्तीचे काम जवळपास ८० टक्के झाले पुर्ण
हिंगोली (Hingoli water supply) : गांगलवाडी पुलाजवळील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन वाहुन गेल्याने हिंगोली शहरात १० दिवसांपासुन निर्जळीचा सामना करावा लागत आहे. नगर पालिका (Water Supply) पाणी पुरवठा विभागातर्फे दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर केल्याने गुरूवारी हिंगोली शहरात पाणी पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. सिध्द नदीजवळील पाईपलाईन अतिवृष्टीमुळे (Heavy rain) वाहुन गेली होती. नगर पालिका पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने दिवसरात्र करून दुरूस्तीचे काम पुर्ण केले आहे. जवळपास ८० टक्के काम पुर्ण झाले असून बुधवारी पाईपलाईन कॉक्रीट टाकले जाणार आहे. त्यानंतर झालेल्या कामाची चाचणी घेवून गुरूवारी शहरात (Water Supply) पाणी पुरवठा सोडण्याबाबत नियोजन केले जात आहे.
नागरिकांनी पाणी उकळुन प्यावे- अरविंद मुंढे
जिल्ह्यात १ ते ३ सप्टेंबर दरम्यान झालेल्या (Heavy rain) अतिवृष्टीमुळे गांगलवाडी परिसरातील सिध्द नदीजवळील पाणी पुुरवठ्याची पाईपलाईन वाहुन गेली होती. सदर ठिकाणी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी भेट देवुन पथकाला काही मार्गदर्शक सुचना केल्या. नगर पालिका पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने २४ तास दुरूस्तीचे काम केल्याने हिंगोली शहरात गुरूवारी पाणी पुरवठा होण्याची शक्यता बळावली आहे. काही नागरिकाकडे पुर्वीच्या पिण्याच्या पाण्याचा साठा (Water Supply) असल्यामुळे त्यांनी हे पाणी उकळुुन प्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केले आहे. शहरात निर्जळीचा सामना करावा लागत असताना नागरिकांनी ही नगर पालिकेला सहकार्य केल्याने मुख्याधिकारी मुंढे यांनी समाधान व्यक्त केले.