हिंगोलीतील पाणीपुरवठ्याच्या दुरूस्तीला लागणार आणखी दोन दिवस
हिंगोली (Hingoli Water supply) : गांगलवाडी पुलाजवळील पाणी पुरवठ्याची पाईप लाईन १ सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे वाहून गेली होती. त्यामुळे हिंगोली शहरात नऊ दिवसांपासुन निर्जळीचा सामना करावा लागत आहे. दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून आणखी दोन दिवस दुरूस्तीला लागणार असल्याची माहिती (City council) नगर परिषद पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
सिद्ध नदीवरील पाईपलाईन दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर
अतिवृष्टीमुळे हिंगोली शहराला पाणी पुरवठा (Water supply) करणारी पाईपलाईन सिध्द नदीवरून वाहुन गेली. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी भेट देवुन पाहणी केली होती. मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंढे हे वेळोवेळी कामाचा आढावा घेत आहेत. पुलाखालील पाईपलाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले असून पुलावरील पाईप लाईन जोडण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरू होण्याकरीता हिंगोलीकरांना आणखी दोन दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पाणी पुरवठा विभागाचे पथक २४ तास तळ ठोकून
अतिवृष्टीमुळे पाईपलाईन (Water supply) वाहूून गेल्याने मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अभियंता प्रतिक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळुु बांगर, पाणी पुुरवठा विभागाचे प्रभारी अभियंंता वसंत पुतळे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे सय्यद शकील हाश्मी, अमोल पाटोळे, शिवाजी जाधव, पिंटु मोटे व कंत्राटदार संदिप भोवर हे २४ तास तळ ठोकुन आहेत. दिवसरात्र एक करून पाईपलाईन टाकणे व इतर दुरूस्तीचे कामे केली जात आहेत. नऊ दिवसांपासुन निर्जळी असल्यामुळे हिंगोली शहरात केव्हा पाणी पुरवठा (Water supply) सुरू होणार याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे.