हिंगोली (Hingoli):- शहरातील प्रगती नगर भागात सासरवाडीत आलेल्या पत्नीवर पोलीस कर्मचारी असलेल्या पतीने बुधवारी रात्रीच्या सुमारास पिस्टल मधून गोळी झाडून पत्नीचा हत्या (Murder)केला तसेच सासू व मेहुण्यावरही गोळ्या झाडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड रुग्णालयात(Hospital) उपचार सुरू आहे. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी मध्यरात्री पकडले.
सासू व मेहुण्यावरही गोळ्या झाडल्याने दोघेही गंभीर
अधिक माहिती अशी की, वसमत शहर पोलीस ठाण्यामधील (police station)पोलीस कर्मचारी विलास मुकाडे याचे मागील काही दिवसापासून पत्नी मयुरी मुकाडे हिच्या सोबत वाद सुरू होते. त्यामुळे ती हिंगोली शहरातील प्रगती नगरात सासुरवाडीला आली होती. पती विलास हा मयुरीला घटस्फोटाची (divorce) मागणी करत असल्याने वाद सुरू होता. 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास विलास मुकाडे याने पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रगारातून 9 एम. एम. चे पिस्टल व काडतुस घेऊन थेट प्रगती नगरात सासुरवाडीत येऊन धडकला या ठिकाणी मयुरी सोबत त्याने वाद घालून सोबत आनलेल्या पिस्टलमधून गोळ्या पत्नी मयुरीचा फोन केला याचवेळी घरामध्ये असलेल्या सासू वंदना धनवे व मेहुना योगेश धनवे आणि विलासने स्वतःच्या मुलावरही गोळ्या झाडल्या. या प्रकरणात एकूण सहा गोळ्या झाडल्याचे प्राथमिक चौकशी दरम्यान स्पष्ट झाले आहे, घटनेनंतर विलास ने पलायन केले घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सह पथकाने तात्काळ घाव घेऊन जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले आणि पलायन केलेल्या विलास च्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना केले.
गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी मध्यरात्री पकडले
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने यांच्यासह पथकाने रात्री शोध मोहीम सुरू केली. कारवाडी शिवारामध्ये परिसर पिंजून काढत असताना शेतामध्ये दबा धरून बसलेल्या विलासला पोलिसांनी पकडून आणले त्यानंतर त्याला हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान या प्रकरणातील गंभीर जखमी असलेल्या वंदना धनवे आणि मेहुना योगेश धनवे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड रुग्णालयात हलविण्यात आले त्यांच्यावर आज गुरुवारी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे. एकूणत: पोलीस कर्मचारी विलास मुकाडे यांनी रागाच्या भरात आपली पत्नी मयुरीचा खुन करून सासू व मेहुना आणि मुला वर पिस्टल च्या गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल(Filed a case) होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.