औंढा नागनाथ (Aundha Nagnath):- औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव परिसरातील पूर्णा मुख्य कालव्यात (canal) हातपाय धुण्यासाठी गेलेल्या तरुण बुडाल्याची घटना सोमवारी घडली, रात्री उशिरा प्रकरण उघडकीस आल्या नंतर औंढा पोलिसांसह परिसरातील तरुणांनी शोध घेतला. परंतु, अंधारात सदर युवक आढळून आला नाही. मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास अंजनवाडी परिसरात युवकाचा मृतदेह आढळून आला. अमन जमील कुरेशी वय १९ राहणार गोळेगाव असे बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
हातपाय धुण्यासाठी गेलेल्या तरुण बुडाल्याची घटना
औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील तरुण अमन कुरेशी दुपारी औंढा नागनाथ येथील लग्न उरकून गावाकडे परत आला. संध्याकाळी घरी न आल्यामुळे त्याला फोन वर संपर्क केला असता तो फोन उचलत नसल्याने घरच्यांना शंका आली. त्या बाबत संध्याकाळी औंढा नागनाथ पोलीस स्थानकात (Police Station) तक्रार दाखल (Complaint filed) करून शोध घेण्याची विनंती करण्यात आली होती. रात्री शोध घेत असतांना ८ वाजे दरम्यान गावाजवळून वाहणाऱ्या कालव्याच्या काठावर सदर तरुणाचा मोबाईल व कपडे (Mobiles and clothes) आढळून आले.
अंजनवाडी शिवारात सदर युवकाचा मृतदेह आढळला
यावरून तरुण कालव्यात बुडाल्याची शंका गडद झाली. रात्री उशिरा पर्यंत स्थानिक तरुणांनी जवळा बाजार पर्यंत कालव्यात तरुणाचा शोध घेतला परंतु पाण्याचा प्रवाह (water flow) व अंधारामुळे यश आले नाही. बुधवारी सकाळी पुन्हा शोध घेत असतांना अंजनवाडी शिवारात सदर युवकाचा मृतदेह (dead body) आढळून आला. अमनला पोहता येत नव्हते, त्यामुळे कालव्याच्या काठावर बसून तो हातपाय धुत असतांना पाय घसरून पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कालव्यात बुडून मृत्यू होण्याची वर्षभरातील हि तीसरी घटना
गोळेगाव परिसरात कालव्यात बुडून मृत्यू होण्याची वर्षभरातील हि तीसरी घटना असून यापूर्वी अंजनवाडी येथील एक तरुणी तर सुकापूर येथील तरुण बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. दुपारी उन्हाचा पारा वाढत असल्याने कॅनॉल परिसरातील अनेक जण कालव्यात उतरून पोहतात, त्यामुळे अश्या दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. औंढा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जिएस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.