हिंगोली (Tiranga rally) : यंदाही देशात घरोघरी तिरंगा हा देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या नेतृत्वात आज तिरंगा रँलीचे (Tiranga rally) आयोजन करण्यात आले होते. त्यासोबत उपस्थित अधिका-यांनी तिरंगा शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी (सा. प्र.), अनंतकुमार कुंभार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) संजय कुलकर्णी तसेच इतर विभाग प्रमुख यांच्यासह सर्व विभागातील कर्मचारी सहभागी होते.
यावर्षीही हिंगोली जिल्हा प्रशासनातर्फे दि. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षापासून राज्यात घरोघरी तिरंगा हे अभियान साजरे केले जात आहे. ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी (Tiranga rally) तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा हे अभियान राष्ट्रभक्ती चेतवणारे अभियान असून या काळात प्रत्येक दिवशी रॅलीसह, मॅरेथॉन, सांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत तिरंगा रँलीचे आयोजन शहरात करण्यात आले होते.
सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने तिरंगा ध्वज हातात घेऊन (Tiranga rally) तिरंगा रँलीत सहभागी झाले होते.