औंढा नागनाथ(Hingoli):- येथील दीपावलीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले येथील नागनाथ प्रभूची पिंड व विवीध नागनाथ देवास शस्त्र अर्पण विविध अलंकाराने वडील पूजा करण्यात आली.
नागनाथ दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी
दरवर्षी प्रमाणे या वर्षी २ नोव्हेंबर रोजी नागनाथ देवाच्या डोक्यावर चांदीची गंगा व नाग रूपा बसवण्यात आला होता. विविध अलंकाराने दीपावली व पाडव्यानिमित्त मुख्य पुजारी हरिहर भोपी व किरण गोरे नागेश्वर गुरव कमलाकर भोपी यांनी केली यावेळी देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, सुरक्षा गार्डन बबन सोनवणे, संतोष गोबाडे, जगदेव दिंडे, नामदेव माने आदी नागनाथाचे कर्मचारी उपस्थित होते दीपावलीनिमित्त व पाडवा निमित्त नागनाथ दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी (Crowd) केली होती.