कळमेश्वरातील ऐतिहासिक रथयात्रा उत्साहात, लाखांवर भाविकांची उपस्थीती
कळमेश्वर (Nagpur) : 327 वर्षांचा सांस्कृतिक वारसा जोपासणारा व रात्रभर चालणारा (Historic Yatra) इतिहासिक कळमेश्वर रथयात्रा (Ratha Yatra) महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महोत्सवात जोड मारुती चौकातील दहीहंडी आकर्षण ठरली. शहरात ठिक ठिकाणी उभारलेल्या विविध देखाव्यांनी भाविकांना रिझवले. यावेळी यात्रेदरम्यान नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी, व्यायाम शाळेची प्रात्यक्षिके, संगीत खडा तमाशा, पारंपारिक दिंडीसह, डीजे व धुमाळचा समावेश, स्वागत द्वाराने शहराची सजावट, रथयात्रा मार्गांवर खाद्यपदार्थांचे वितरण, यात्रेचे ठळक वैशिष्ट्ये होती. अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या या यात्रेसाठी विदर्भाच्या कानाकोपर्यातून लाखांवर भाविकांनी हजेरी लावली होती.
शहरात (Ratha Yatra) रथयाञेसाठी घरोघरी पाहून्यांची वर्दळ मोठी होती. येथील सुप्रसिद्ध श्रीहरी मंदिरातून रथयात्रेला शनिवारी 1 वाजता श्रीहरी मंदिराचे विश्वस्त यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चना शरद पाठक, शशिकांत पाठक, राजुभाऊ पाठक यांनी करून सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. राजीव पोतदार, कळमेश्वर पालिकेचे मुखयाधिकारी तथा प्रशासक आकाश सुरडकर , माजी मुख्या्धिकारी रामेश्वर पडांगले, अँड.प्रकाश टेकाडे, दिलीप धोटे, कृष्णाजी बगडे, गणेश लंगडे, रथयाञा उत्सव समीती अध्यक्ष गणेश शिरभाते, नचिकांत लंगडे, धनराज देवके, माजी उपाध्यक्ष जोस्तना मंडपे, घनशाम मक्कासरे, प्रमोद कोल्हे, पिंटू निंबाळकर आदिसह मोठ्या संख्येने नागरिक तथा विविध राजकीय पक्षांचे पदधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी दिंड्या-झांज, भजनी मंडळ ,बँड, डीजे सह बाबुळगाव येथील धूमाळच्या गजरात आकर्षण देखावे व (Jai Shri Ram) प्रभु श्रीरामचंद्राच्या पालखीसह पवनपुञ हनूमाण विराजमान असलेला व विद्युत रोषणाईने सजवलेला तीन मजली लाकडी रथ शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आला.
राञी 12.45 वा. प्रभु श्री रामांच्या (Jai Shri Ram) पालखीचे दर्शन व दोरखंडाने बांधलेला एतिहासिक रथ ओढण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रथयात्रेनिमीत्त गावकरी व सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने शहराला नववधूप्रमाणे सजविण्यात आले होते. ठिकठिकाणी रथयाञेचे भाविकांनी स्वागत केले. चौकाचौकात रथयात्रा पाहण्यासाठी लहानांपासून तर थोरा मोठ्यांपर्यंत हजारो भाविक जमले होते. रथापुढे असणाऱ्या दिंडी भजन मंडळ बँड पथक धुमाळ व डीजेच्या संगीतावर वारकऱ्यांसह तरुणाई थिरकत होती. दरम्यान फटाक्यांची आतषबाजी व “जय श्री राम” च्या (Jai Shri Ram) जयघोषाने कळमेश्वर नगरी दुमदुमली होती.
यात्रे दरम्यान येथील बाजार चौकात हनुमान व्यायाम शाळा व शिवाजी आखाडाचे उद्घाटन येथे डॉ . राजीव पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही आखाड्यातील पहिलवानांनी पारंपारीक कसरतीची सहाशी प्रात्यक्षिके सादर केली. प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. शहराची परिक्रमा करीत रथयात्रा बाजार चौकातील हनुमान मंदिराजवळ पहाटे ४ वाजता पोहचली. रथयात्रेच्या मार्गावर तुळजादेवी, शिवाजी महाराज,गजानन महाराज, साईबाबा आदी देव देवतांचे देखावे उभारण्यात आले होते. शुक्रवारी बाजारचौक येथे सकाळी नऊ वाजतापासून दूय्यम गमतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली यामध्ये शाहिर माणिकराव देशमुख विरुद्ध विष्णुदास आझाद यांच्यात जुगलबंदी रंगली होती. यावेळी शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो भाविकांनी गमतीचा आस्वाद घेतला.
या रथयाञेची तयारी नियोजनबद्ध पद्धतीने अनेक दिवसांपासून सुरु असते. यात स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांचे सहकार्य मोलाचे असते. यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार योगेश कामाले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यासाठी नागपूर येथून अधिक कुमक बोलावण्यात आली होती.यामध्ये दंगा नियंञन पथकाचा समावेश होता.
सामाजिक संघटनांकडून खाद्यपदार्थांचे वितरण
रथयात्रेच्या मार्गावर शहरातील सामाजिक संघटना व शिवस्वराज्य संघटना, जोडमारोती मिञमंडळ, बाबा बर्फाणी मिञ मंडळ, तळाचीपाळ मिञमंडळ, माळी समाज संघटना, शहर भाजपा, साईबाबा भक्तगण, युवा व्यापारी मिञ मंडळ आदिंसह अनेक व्यावसायीक नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून पोहा, मसाले भात, सरबत व साबूदाना, बूंदा, मठ्ठा, जिलेबी आदि खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आले.
क्षणचित्रे
तळाची पाळ मिञ मंडळाची बाहूबली हणूमान झाकी तर जोड मारोती मिञ मंडळाची दहिहंडी ठरली आकर्षन विविध झाक्यांनी भाविकांना रिझविले.
फटाक्यांची आतषबाजी, व्यायाम शाळेची प्रात्यक्षिके, संगीत खडा तमाशा, विदर्भातून सूमारे दिड लाखांवर पहिल्यांदाच भाविकांची हजेरी, विघूत रोषनाई व स्वागत द्वाराने शहर नटले. पारंपारिक दिंड्यांसहा डीजे व धुमाळ यांचा समावेश, सामाजिक संघटनांचा सहभाग, खाद्यपदार्थांचे वितरण, विविध राजकीय पुढाऱ्यांची आवर्जून उपस्थिती होते. तळाचीपाळ मिञ परिवारातर्फैब्राम्हणी फाटा चौक ते बाजारचौक पर्यंत याही वर्षी सात चिञरथांची मिरवनूक डिजे,धूमाळ,बॅंडपथकाच्या गजरात आकर्षक रोषनाई, फटाक्यांच्या आतीषबाजीत दाखल केल्याने या रथयाञेला आणखी काही रंगतच चढली.