पुसद (Historical monument) : शहरातील पूस नदी तीरावरील बांधाजवळील कुस्त्यांच्या आखाड्याला लागून (historical monument) मध्ययुगीन काळातील गद्यगळ शिळालेख आढळून आला आहे. ऐतिहासिक नोंदीत ‘गधेगळ’ नावाने ओळखले जाणारे शिल्प, शिळालेख जतन करण्याची आवश्यकता असतांना, मात्र पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे हा शिळालेख अडगळीत पडलेला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता असतांना ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
प्राप्त माहिती अशी की, शहरातील पूस नदी तीरावरील बांधाजवळील कुस्त्यांच्या आखाड्याला लागून मध्ययुगीन काळातील गद्यगळ शिळालेख धूळखात अवस्थेत पडून आहे. हा शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करतात.मध्ययुगीन भाषिक इतिहासावरही प्रकाश टाकता येतो. त्याचा (Historical heritage) ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्व समजून घेणं अपेक्षित असताना मात्र, ऐतिहासिक ठेवा पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहे. यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावा उपेक्षित ठेवण्याऐवजी जतनकरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मध्ययुगीन काळातील शिळालेख (historical monument) हा त्या वेळेच्या राजघराण्याशी संबंधाचा निष्कर्ष ‘गधेगळ’ म्हणून ओळखला जाणारा आहे. हा शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करत आहे. यापैकी एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा म्हणजे ‘गधेगळ’ हा शिळालेख. दहाव्या शतकात शिलाहार राजांच्या (Maharashtra Rule) महाराष्ट्रातील राजवटीत निर्माण झालेला हा शिळालेख असल्याच्या जाणकारांचे मत आहे. केवळ एक लिखित पुरावाच नाही तर, राजाच्या आज्ञेची भीती घालणारा आणि त्याकाळातील महिलांचे सामाजिक स्थान दर्शवणारा एक स्तंभ असल्याचे मानले जाते. शिळालेखावर वरच्या टप्प्यात चंद्र, सूर्य यांच्या प्रतिमा यावर कोरलेल्या असून, खालच्या टप्प्यात यावर एक प्रतिमा कोरलेली आहे. यात एक गाढव आरूढ होऊन बळजबरी समागम करताना दिसत आहे”
इतिहास संशोधकांच्या (History researcher) मते, अशी प्रतिमा शिळालेखाला ‘गधेगळ’ हे नाव पडलं. म्हणजेच शिलालेखामध्ये लिहिलेली माहिती अथवा आज्ञा जे कोणी पाळणार नाहीत, त्यांच्या सोबत असे कोणते कृत्य केले जाईल अशी ती धमकी आहे.”तर या गधेगळांवर असलेल्या चंद्र आणि सूर्याच्या प्रतिमेबद्दल असं सांगितलं जाते की, “‘आ चंद, सूर्य नांदो…’, म्हणजे चंद्र आणि सूर्य अस्तित्वात असे पर्यंत ही आज्ञा कायम राहील म्हणून यावर चंद्र, सूर्य कोरलेले असतात.” गधेगळांवर लिहिलेली राजाज्ञा मोडली तर तुमच्यावर कारवाई करण्याचा संदेश असल्याचे बोलल्या जाते. असे शिलालेख १० ते १६व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधित असल्याने हा दुर्मिळ शिलालेख असल्याचा जाणकाराचं मत आहे. त्यामुळे अहा शिळालेख आपला इतिहास उलगडतो.
ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्वाचा असल्याने या शिळालेखाकडे त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्व समजून घेणं अपेक्षित असताना मात्र, (Historical heritage) ऐतिहासिक ठेवा पुरातत्त्व विभागाच्या (Department of Archaeology) दुर्लक्षपणामुळे अडगळीत पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहे. यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावा उपेक्षित ठेवण्याऐवजी जतनकरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.