ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळाची माहिती
कोरची (Historical religious) : कोरची येथील पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरचीच्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट या सहशालेय उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभूती देणे हे शाळेचे प्राधान्य क्रम कार्य राहिलेले आहे. अशाच सहशालेय (Historical religious) उपक्रमांतर्गत विद्यार्थींना गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इतियाडोह धरण ,पर्यटन व्यवसायाबदल माहिती व्हावी. तसेच काही शाळा भेट घेऊन तेथील शिक्षण प्रणालीची माहिती व्हावी.या हेतुने शाळा व्यवस्थापक समितीच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून शाळेच्या मुख्याध्यापीका सौ.प्रमोदिनी काटेंगे यांच्या सहकार्यातुन या क्षेत्रभेटीचे आयोजन केले.
क्षेत्र भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना सर्वप्रथम गाढवी नदीवर बांधलेले इतियाडोह धरणाची माहिती देण्यात आली. विनोद भजने यांनी इतियाडोह धरणाबद्दल सविस्तर माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत येथील पाणी कालव्या द्वारे नेले जाते. ओव्हरफ्लोव पाणी जाण्याचे ठिकाण पाहण्यात आले. (Historical religious) विध्यार्थी व शिक्षकांनी त्याचे निरीक्षण केले. तेथील पाण्याची क्षमता, खोलीकरण याबद्दल माहिती मिळवण्यात आली.यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल.
डब्बापार्टी नंतर नवेगाव बांध येथे मिनी ट्रेन वरून प्रवास करण्यात आले. (Historical religious) काही विद्यार्थ्यांनी उंटाची सफारी केली. काहींनी घोड्याची सफारी केली. लहान विध्यार्थ्यानी टाकीतील बोटिंग केली. राऊंड घसरगुण्डी, सलाईडींग, रोपवे, जंपिंग गेम अशा विविध खेळातून खूप मज्जा आणि गंम्मत केली. डाँसिन्ग हाऊस मध्ये खूप डान्स केले .विद्यार्थ्यांनी नवीन बगीच्यातील विविध फुलझाडे, वेगवेगळ्या वनस्पती यांचे निरीक्षण केले.
तुषार सिंचन व ठिबंक सिंचन हे प्रत्यक्षात दाखवण्यात आले.तेथील रेस्ट हाऊस चे निरीक्षण करण्यात आले. विविध उपक्रमांतुन शिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून झाले.आरती चांदेकर यांनी शेल्फी स्टिकणे विध्यार्थ्यांच्या फोटो शूट केल्या. तेथील विविध साहित्याचे परिचय प्रमोदिनी काटेंगे मु. अ.यांनी विध्यार्थ्यांना पटवून दिले. स्लाईड गेम मध्ये विध्यार्थ्यानी खूप मज्जा केली. कांता साखरे यांनी नवेगाव बांध याबद्दल विध्यार्थ्यांना माहिती दिली. डान्स हाऊस बद्दलची माहिती मारोती अंबादे यांनी दिली. पुष्पा पेरगार आणि शेवन्ता कवडो यांनी वनविभाग याबद्दल माहिती दिली.
हरिश्चंद्र भोवते आणि सुरेखा कातेंगे यांनी नवेगाव बांध येथे व्यवसायाला चालना कशी मिळाली याबद्दल माहिती दिली. (Historical religious) सर्व माहिती विध्यार्थ्यानी जाणुन घेतली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीषा नखाते, सदस्य लतिका ठलाल, सुरेखा बखर, वेणूबाई सोनार व सर्व विद्याथीँनी व शिक्षकांनी स्नेहपुर्वक सहलीचा आनंद घेतला.नवेगाव येथे स्नेहभोजन करण्यात आले. गुलाब जामून या गोड पदार्थाने सर्वांचे तोंड गोड झाले आणि तिन्ही बसेस सर्वाना घेऊन कोरचीला सुखरूप परतले. शैक्षणिक सहलीकरिता मु.अ. प्रमोदिनी काटेंगे, शिक्षक विनोद भजने,मारोती अंबादे, कांता साखरे,आरती चांदेकर, पुष्पा पेरगार, शेवंता कवडो,हरिचंद्र भोवते,सुरेखा काटेंगे यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी शाळेच्या मुखाध्यापीका सौ.प्रमोदिन काटेंगे मंडम, आरती चांदेकर,विनोद भजने,मारोती अंबादे,कांता साखरे, हरिंचंद्र भोवते ,पृष्पा पेरगार,शेवता कवडो ,सुरेखा कांटेंगे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.मनिषा नखाते व समितीचे सदस्य,पदाधिकारी उपस्थित होत्या. अशा प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पुस्तके ज्ञान सोबतच बाह्य जगाचे ज्ञान मिळवावे हा प्रमुख उद्देश होता व या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विविध वाटा याबद्दल माहिती झाली व सर्वांना आनंद सुद्धा झाला ह्या सुंदर नियोजनाबद्दल कोरची पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अमित दास ,केंद्र प्रमुख हिराजी रामटेके यांनी सर्वांचे अभिनंदन केले.