हिंगोली (Shiv Jayanti) : हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरात आज शनिवार दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी चार वाजता शिवजयंती महोत्सव (Shiv Jayanti) समितीच्या वतीने वैभव विष्णू कोटकर प्रस्तुत शिवकालीन व ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे
या प्रदर्शनात देश विदेशी देशातील नाणी नोटांचे प्रदर्शन व त्यांचा इतिहास मांडण्यात येणार आहे. सोबतच शिवकालीन नाणी वस्तूंचे प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज (Shiv Jayanti) पूर्णाकृती पुतळा परिसरात पार पडणार आहे. हिंगोली शहरातील युवक वैभव कोटकर यांनी दहा वर्षापासून या नाण्यांचे व नोटांचे संकलन केले असून, त्याचे प्रदर्शन सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे. ही प्रदर्शनी पाहण्यासाठी जास्तीत जास्त शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, अशी आवाहन सार्वजनिक (Shiv Jayanti) शिवजयंती महोत्सव समिती हिंगोली च्या वतीने करण्यात येत आहे.