बंजारा विरासत नंगारा वास्तू लोकार्पण साठी संग्रहालय सज्ज
मानोरा (Banjara Samaj) : तिर्थक्षेत्र बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथील चार मजल्यांच्या बंजारा विरासत वास्तू संग्रहालयात चार मजल्यात एकूण १३ गॅलरीत साकारण्यात आले आहे. प्रत्येक गॅलरीत विविध प्रकारचे देखावे आणि चित्रांच्या सहाय्याने (Banjara Samaj) बंजारा समाजाचा संपूर्ण इतिहास रचला गेला आहे.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
बाहेरून आलेल्या पर्यटकास लिफ्टने चौथ्या मजल्यावर पोहचल्यावर त्याची सुरवात निसर्ग पूजक बंजारा समाजाच्या आरदास गॅलरी पासून सुरवात होईल पहिल्या गॅलरीत बंजारा समाजात जन्म झाल्या पासून, विवाह व मृत्यू पर्यंत पूर्ण माहिती, देखावा चित्रच्या माध्यमातून दुसऱ्या गॅलरीत बंजारा समाजातील उत्सव, सण, समाजातील परंपरा यांचे सादरीकरण, तिसरा माळा चौथी गॅलरीत (Banjara Samaj) बंजारा समाज गाई बैलाच्या साहाय्याने व्यापार लदेनी करायचा याची चित्र व लिखित पूर्ण माहिती, पाचव्या गॅलरीतून बंजारा समाज व राजस्थान राज्य बाबत पूर्ण माहिती सहाव्या गॅलरीत आठव्या शतकातील वैभवशाली (Banjara Samaj) गोर बंजारा इतिहास याची माहिती दुसरा माळा सातवी गॅलरी बंजारा व शिख समुदायाची समाज यांचा इतिहास बंजारा व शीख समाज गुरु भाऊ याचा पूर्ण इतिहास याची माहिती आठवी गॅलरी थ्रीडी थेटर मधून बंजारा समाजाची माहिती चलचित्रातून मांडणी, नऊवी गॅलरी जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांचे जीवन चरित्र व बोल यांची माहिती. पहिला माळा दहावी गॅलरी ब्रिटिश व बंजारा यांचा इतिहास यांची माहिती. अकरावी गॅलरी क्रिमीलीअर ट्राईब ऍक्ट याची माहिती समाजाचा रोजगार कसा हिरवला गेला याची पूर्ण माहिती मिळणार आहे.
बारावी गॅलरी देश स्वातंत्र झाल्यावर समाजाची स्थिती यावर प्रकाश टाकणारी गॅलरी तेरावी गॅलरी (Banjara Samaj) बंजारा समाजातील थोर पुरुष ज्यांनी समाजा करिता अतुलनीय कार्य केले. त्यांचा पुतळा व त्यानी केलेले कार्य यांची माहिती जसे राष्ट्रसंत डॉ रामराव बापू महाराज, हरितक्रांतीचे जनक महानायक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, जलक्रांती जनक माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, पद्मश्री रामसिंग भानावत यांचे सह अनेक थोर समाज सुधारक यांचा पुतळा व त्यानी केलेल्या कार्याची माहिती नवीन पिढीला माहिती होणार आहे.
ना. संजय राठोड यांचे नाव अजरामर राहणार !
बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास सांगणारी वीरासत -ए – बंजारा संग्राहलय (Banjara Samaj) उभी राहली आहे. या वास्तुच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान विसरता येणार नाही. मात्र राष्ट्रसंत डॉ रामराव बापू महाराज यांचे कृपा पात्र शिष्य यवतमाळ वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचे नाव या वास्तुमुळे अजरामर झाले आहे. हे समाज बांधव केव्हाही न नाकारता विसरणार नाही.




