न्यू ऑर्लिन्स (Hit and Run case) : संपूर्ण जग नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करत असताना, अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये एक दुःखद घटना घडली. नवीन वर्षाच्या पहाटे एका टोळक्याला कारने चिरडले. त्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. माहितीनुसार, (Bourbon Street Accident) बोर्बन स्ट्रीट आणि इबरविले जवळ पहाटे 3:15 च्या सुमारास हा (Hit and Run case) अपघात झाला. फ्रेंच क्वार्टरमधील प्रसिद्ध पर्यटक आकर्षण असलेल्या बोर्बन स्ट्रीटवर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. परंतु उत्सवादरम्यानच्या भयानक दृश्याने सर्वजण किंचाळले.
truck attack new orleans, bourbon street video, new orleans, bourbon street attack, new orleans bourbon street attack, new orleans attack, bourbon street crash, bourbon street accident, bourbon street cam, live video of bourbon street,bourbon street suspect,
full video in commant pic.twitter.com/9fq0P3Vu9J
— Turgut (@Turgut32001) January 1, 2025
माहितीनुसार, पहाटे 3:15 च्या सुमारास न्यू ऑर्लिन्समधील बोर्बन स्ट्रीट आणि इबरविलेच्या चौकात एका एसयूव्हीने पादचाऱ्यांना धडक दिली आणि चिरडले. अपघातानंतर, ड्रायव्हर कथितपणे वाहनातून बाहेर पडला आणि (Hit and Run case) त्याने गोळीबार सुरू केला. ज्यामुळे पोलिसांसोबत गोळीबार झाला. साक्षीदारांनी या माहितीची पुष्टी केली.
या (Hit and Run case) घटनेनंतर बोर्बन स्ट्रीट सील करण्यात आला आणि जखमींची काळजी घेण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, सोशल मीडिया साइट X वरील अहवालात असेही म्हटले आहे की, या (Bourbon Street Accident) अपघातात किमान 10 किंवा त्याहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.