Nagpur Accident:- फडवीसांच्या नागपुरातच हिट अॅन्ड रनचा प्रकार घडला आहे. नागपुरातील झेंडा चौकात मद्यधुंद कारचालकाने तीन जणांना धडक दिली. यात एका बाळाचाही समावेश असल्याची माहिती आहे.
एकाला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले
या घटनेनंतर कारमधील तीन जणांपैकी दोघे पळाले. तर एकाला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सनी चव्हाण, अंशुल ढाले आणि आकाश अशी आरोपींची नावे आहेत. अपघातानंतर जमावाने मद्यधुंद ड्राईव्हर (Drunk driver) तरुणाला बेदम चोप दिलाय. त्यानंतर जमावाने तरुणाला पोलिसांच्या ताब्यात (possession) दिलं. या गाडीमध्ये अमली पदार्थ (Drugs) ही सापडले आहेत. एकाच आठवड्यात राज्यात दोन हिट अॅन्ड रनच्या (Hit and run) घटनेमुळे राज्यातील गृहविभाग (Home Department) नेमके करतेय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
हिट अॅन्ड रन प्रकरणावरून राज्यभरातून पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहे
सध्या पुण्यातील (Pune) हिट अॅन्ड रन प्रकरणावरून राज्यभरातून पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहे. पोलिसांच्या या कारभारावरून विरोधकांनी गृहमंत्री फडणवीसांची (Home Minister Fadnavis) कोंडी करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण ताजे असतानाच फडणवीसांच्या नागपुरातच मद्यधुंद(Drunk) कारचालकाने पायी चाललेल्या एका जोडप्याला जोरदार धडक दिली. यात बाळासह जोडप्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.ही माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले. याशिवाय तपास करीत तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.