जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. नितीन तडस यांनी केली पाहणी
औंढा नागनाथ (HMPV virus) : ग्रामीण रुग्णालयाची एच एम पी व्ही व्हायरसच्या अनुषंगाने आज दिनांक 13 जानेवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी पाहणी केली. यावेळी एच एम व्ही च्या अनुषंगाने 10 जनरल बेड चार ऑक्सिजन बेड 20 ऑक्सीजन बेड डायलेसीच्या पाच मशीन तीस रुग्णाची व्यवस्था (HMPV virus) ग्रामीण रुग्णालयात तयारी करण्यात आली.
यावेळी उपस्थित पाहणी करताना उपस्थित डॉक्टर मंगेश चेहरे, डॉक्टर गोपाल कदम, डॉक्टर स्नेहल नागरे, डॉक्टर बालाजी भाकरे, वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर सुनतकरी मॅडम, डॉक्टर गजानन हरण, डॉक्टर सतीश वाकळे, यांच्यासह रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.