हिंगोली (hingoli):- मुंबईतील (Mumbai)घाटकोपर भागात भलेमोठे होर्डिंग्स कोसळून जवळपास पंधरापेक्षा अधिकजण ठार झाले होते. या घटनेमुळे सर्वत्र ठिकाणी उभारलेल्या मोठ्या होल्डींग बाबत हाच प्रश्न उपस्थित झाल्याने हिंगोलीत नगर परिषदेच्या पथकाने सहा होल्डींग धारकांना नोटीस बजावून ते काढण्यास सुरूवात केली. तसेच शहरातील ३८ भ्रमणध्वनी मनोरा चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी इमारतीसह अन्य ठिकाणी मोठे होर्डिंग्स
हिंगोली शहरात अनेक ठिकाणी इमारतीसह अन्य ठिकाणी मोठे होर्डिंग्स उभारण्यात आलेले आहेत. असे होर्डिंग्स कोसळून एखादी दुर्दैवी घटना (unfortunate incident) नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नगर परिषदांना दिलेल्या सुचनेनुसार हिंगोली शहरातील विविध ठिकाणचे सहा होर्डिंग काढुन घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु हे होर्डिंग काढुन घेतले नसल्याने ३० मे रोजी हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठ (Main market) असलेल्या महात्मा गांधी चौकासह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (Dr. Babasaheb Ambedkar) आदी ठिकाणचे होल्डींग नगर परिषदेच्या पथकामार्फत काढून घेण्यात आले. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, नगर रचनाकार किशोर काकडे, शाम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळु बांगर, अग्निशमन प्रमुख भागवत धायतडक, विनय साहु, संदिप घुगे, उत्तम जाधव यासह इतर कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते.
ही ठिकाणी उभारलेल्या मनोर्याचे नाहरकत प्रमाणपत्र नसल्याची माहिती
विशेष म्हणजे हिंगोली शहरामध्ये विविध ठिकाणी अनेक कंपन्यांच्या भ्रमणध्यवनी (travel newspaper)धारकाने इमारतीसह जमीनीवर मनोर्याची उभारणी केली आहे. त्यामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी शहरातील ३८ मोबाईल मनोरा चालकांना नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये मोबाईल मनोरा उभारणीकरिता नगर परिषद कार्यालयाचे आवश्यक असलेले परवानगी, नाहरकत घेतली असल्यास त्याची प्रत कार्यालयास सादर करावी, या मोबाईल मनोर्याचे संरचनात्मक लेखापरिक्षण (Audit) केले आहे किंवा नाही, सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत किंवा नाही याचीही कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिलेल्या मुदतीमध्ये कागदपत्र सादर न केल्यास आपल्या विरूद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल, तसेच एखाद्या वेळी मनोरा कोसळून जीवीत अथवा वित्त हानी घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी मनोर्याच्या कंपनीवर राहील, असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी उभारलेल्या मनोर्याचे नाहरकत प्रमाणपत्र (NO CERTIFICATE) नसल्याची माहिती सुद्धा उघड झाली आहे.