परभणी (Parbhani):- मुंबई (mumbai)येथे होर्डिंग कोसळल्याच्या घटनेनंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आहे. परभणीत शहर महापालिकेच्या वतीने अनाधिकृत होर्डिंग धारकांवर कारवाई केल्या जात आहे.
अनाधिकृत होर्डिंग धारकावर पहिल्या गुन्ह्याची नोंद
बुधवार २२ मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात अनाधिकृत होर्डिंग (Unauthorized hoarding)धारकावर पहिल्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शहर महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक(Sanitation Inspector) करण गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. परभणी शहरातील उड्डाण पुलाच्या खाली चार टावर उभे करून बॅनर(banner) लावल्या जात होते. ७० ते ८० फूट उंच टावर उभे करण्यात आले होते. सदर टावर चे काम थांबविण्यात आले. संबंधितांना नोटीस देऊन २४ तासाच्या आत अनाधिकृत होर्डिंग काढून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या परंतु संबंधाने होर्डिंग काढून घेतले नाही. २० मे रोजी मनपाच्या पथकाने तपासणी केली असता होर्डिंग जाग्यावरच दिसून आले.
वरिष्ठांच्या आदेशानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. मालमत्ताधारक दत्ताराव पारवे कलावती पारवे प्रीती सोमानी यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहेत. परभणी शहरात इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डिंग असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल (Crimes filed) होण्याची कारवाई होणे आवश्यक आहे.