पुसद (Hoardings flex): पुसद नप कार्यक्षेत्रातील विनापरवानगी मोठ्या प्रमाणात (Hoardings flex) होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनर लावलेले होते. संबंधितांनी नगरपरिषदेकडून या संदर्भात कुठलीही परवानगी घेतली नव्हती. शहरातील 90% बॅनर हे विनापरवाना लावण्यात आलेले होते. मुंबई येथील घाटकोपर येथे असेच महाकाय होर्डिंग कोसळून या दुर्घटनेत प्रथम 14 निष्पाप नागरिक तर उपचारादरम्यान अजून तीन नागरिक दगावले. तर 50 च्या वर निष्पाप नागरिक हे मुंबई येथील राजावाडी हॉस्पिटल्स मध्ये उपचार घेत आहेत. या घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली व राज्यातील सर्वच (Municipal councils) महानगरपालिका नगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रातील विनापरवाना (Hoardings) होर्डिंग बॅनर याचे ऑडिट करून संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देश दिले होते.
दैनिक देशोन्नतीच्या बातमीचा इम्पॅक्ट
त्या अनुषंगाने दि. 16 मे रोजी दैनिक देशोन्नतीच्या अंकामध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर दि.16 मे रोजी (Municipal councils) नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांच्या निर्देशानुसार पुसद नगरपालिकेचे आरोग्य विभाग, कर विभाग यांच्यासह अतिक्रमण विरोधी पथक दस्ता यांनी संयुक्त कारवाई करीत विनापरवाना असलेले 90% बॅनर्स होर्डिंग फ्लेक्स (Hoardings) हे उतरून घेतले. या मोहिमेमध्ये प्रशांत देशमुख, अवी अर्धापूरकर, कर(ब ) विभागाचे विभाग प्रमुख, लिपिक मिर्झा, (Health Department) आरोग्य विभागाचे साफसफाई कर्मचाऱ्यांच्या सुपरवायझर संजय पवार सहभागी झाले होते.
शहरातील उंच इमारतीवर काही लोकांनी होर्डिंग लावलेले आहेत. या सर्वांना नोटीस जारी केली आहे.
– अभिजीत वायकोस, मुख्याधिकारी तथा प्रशासक, पुसद नप