चालकाच्या सतकरतेमुळे वाचले वीस प्रवाशांचे प्राण
अमरावती (Shivshahi bus fire) : नागपूर येथील गणेश पेठ आगाराची शिवशाही एसटी बस क्रमांक एम एच झिरो सिक्स बी डब्ल्यू झिरो नाईन झिरो थ्री ही बस नादुरुस्त असल्यामुळे दोन दिवसापासून अकोला आगारात उभी होती तात्पुरती दुरुस्ती करून अकोल्यावरून नागपूरला ही बस बोलावण्यात आली मात्र गणेश पेठ आगाराचे व्यवस्थापक यांनी विना कंडक्टर बस घेऊन व प्रवासी भरून आणण्यास सांगितल्याचे समजते त्यानुसार चालक यांनी ए आर लासुरकर यांनी आदेशाचे पालन करीत वीस प्रवासी घेऊन अकोल्यावरून नागपूर करिता रवाना झाले बडनेरा नजीक एसटी बस मध्ये बिघाड असल्याचे लक्षात येतात.
चालक लासुरकर यांनी प्रवाशांना उतरून दुसऱ्या बसमध्ये पाठविले व रिकामी बस घेऊन नागपूरकडे रवाना झाले असता बडनेरा येथील पोलीस स्टेशन समोर अचानक टायर फुटले व बस थांबेपर्यंत शंभर फुटाच्या अंतरावर बस थांबल्यानंतर अचानक टायरने पेट घेतला व काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. सुरुवातीला नागरिकांनी पाण्याच्या बकेटने पाणी मारून आग विझवण्याचाआटोकाट प्रयत्न केला परंतु आगीचे भिषण रूप घेतल्याने त्यांचे प्रयत्न असफल ठरले, बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील चव्हाण व पोलीस कर्मचार्यांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले,बडनेरा मनपाचे अग्निशामक दल राज्यपालांच्या बंदोबस्ताकरिता विमानतळावर असल्याने येण्यास विलंब झाला तोपर्यंत बसचा बराच भाग जळून खाक झाला होता. मात्र अग्निशामक दलाच्या दोन ते तिन गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आली. एस टी महामंडळ अनेक काल बाह्य बसेस वापरत असल्याने अशा दुर्घटना घडने ही नित्याचीच बाब झाली आहे एक प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतअसल्याचे या घटनेवरून लक्षात येते.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वाहतूक अधीक्षक भूमिका वैद्य यांनी एसटी कर्मचाऱ्यां सह घटनास्थळी धाव घेतली. परंतु निवासी आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे ह्या निवासस्थानी राहत नसल्यामुळे घटनास्थळी दिसून आल्या नाहीत अशा गंभीर घटना घडल्या तर व्यवस्थापकाची जबाबदारी घटनेवर नियंत्रण आणण्याची असते मात्र आगार व्यवस्थापकच निवासस्थानी राहत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचे कुणाच्या आशीर्वादाने आगार व्यवस्थापक निवासस्थानी राहत नाहीत अशी चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आली.
आग विझवण्याकरिता बडनेरा मनपा अग्निशामक दलाचे अधीक्षक अजय पंधरे यांच्या मार्गदर्शनात फायरमनअजय ढोके, गोविंद घुले ,वैभव गजभारे, संतोष केंद्रे ,गोपाल भाकरे, नरेश राऊत ,सचिन वराडे आदींनी अथक परिश्रम घेतले. अकोला आगारात दोन दिवसापासून नादुरुस्त अवस्थेत उभी असलेली बस तात्पुरती दुरुस्त करून नागपूरला प्रवासी घेऊन का बोलवण्यात आली प्रवासादरम्यान ना दुरुस्त बसणे काही आघाडीत झाले तर प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार होते विना कंडक्टर बस मध्ये प्रवासी का असे फर्मान का दिले असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असून. आता चौकशीत काय निष्पन्न होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.