वाघाळा गावातील घटना, नगद 1 लाख 22 हजार जळाले!
परभणी (House Fire) : परभणीतील पाथरी तालुक्यातील वाघाळा गावात गुरुवार 5 जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणामुळे लागलेल्या आगीत एका कुटुंबाचे नगदी पैशासह संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना सिंधू भगवानराव शेळके यांच्या घरात घडली असून, त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान (Financial Loss) झाले आहे. या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी सिंधू शेळके या शेतामध्ये होत्या आणि त्यांची दोन्ही मुले कामानिमित्त गावाबाहेर गेली होती. सद्यस्थितीत त्या पत्र्याच्या दोन खोल्यांमध्ये तात्पुरते राहत होत्या. शेजारीच नव्या घराचे बांधकाम सुरू असून, बांधकामासाठी जमा करून ठेवलेले रु. 1 लाख 22 रोख, नवीन घराच्या बांधकामासाठी (Construction Of House) आणलेले प्लंबिंग व लाईट फिटिंगचे साहित्य, अन्नधान्य, किराणा सामान, कपडे, भांडी अशा सर्व वस्तू आगीत जळून खाक (Burn Fire) झाल्या.
शेळके कुटुंबावर ओढवले आर्थिक संकट!
या घटनेमुळे शेळके कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, सिंधू शेळके यांनी सांगितले की, इतके मोठे नुकसान सहन करणे कठीण झाले आहे. त्यांनी प्रशासनाकडे (Administration) तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे, जेणेकरून नवीन घराचे काम आणि संसाराची उभारणी पुन्हा करता येईल. या दुर्घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मदत द्यावी, अशी ग्रामस्थांचीही (Villagers) मागणी आहे.