अर्जुनी मोरगांव (Arjuni heavy rain) : तालुक्यामध्ये काल 9 सप्टेंबरच्या मध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस (Arjuni heavy rain) सुरू असून अनेक लहान, मोठे तलाव, बोळी व नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. शेतकरी मायबापाच्या तोंडाशी आलेला भात पीक जमिनीवरती कोसळले असून त्यातच तालुक्यातील खांबी या गावामध्ये ता.१० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास दोन घरे कोसळून पडल्याने त्यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
घर कोसळून पडलेल्यांचे अनुसया महादेव ऊरकुडे व अशोक महादेव ऊरकुडे यांचे घर कोसळून पडले त्यावेळी अनुसया महादेव ऊरकुडे व यांची नात सुन हे त्या कोसलेल्या घरामध्ये जेवनास सुरुवात केली होती त्यातच तो घर कोसळून पडल्याचा मोठा आवाज ऐकू आल्याने अनुसया महादेव ऊरकुडे व नात सुन या दोघेही घरा बाहेर पडल्या व गावातील लोक आवाज ऐकून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली .अशोक महादेव ऊरकुडे यांची मागील आठ ते दहा दिवसापासून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले. सोबतीला त्यांची पत्नी व मुलगा हे दोघेही नागपूर येथील खासगी रुग्णालयात गेले आहे.
अशोक महादेव ऊरकुडे यांच्या घरी त्यावेळी माणूस म्हणून कुणी नसून घरामध्ये असलेली सर्व भांडी व इतर कुटुंब वापराचे साहित्य तिथे असलेल्या नागरीकांनी काढण्यास सुरुवात केली असून मदतीला धावून आल्याचे समजते आहे, (Arjuni heavy rain) अशातच त्यांचा घर सुद्धा कोसळून पडल्याने त्यांच्या कुटुंबांवर दु:खांचा डोंगर कोसळल्याने संबंधित अधिकारी व प्रशासनाने या गंभीर समस्याकडे लक्ष केंद्रित करून नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातील नागरीकांनी केली आहे. अनुसया महादेव ऊरकुडे यांचा घर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला असल्याने मुख्य रस्त्याच्या दिशेला घर कोसळल्याने घराची माती हि मुख्य रस्त्यावर असल्याने तो मार्ग बंद झाला असून वाहतूकीला अडथळा निर्माण झाले आहे. सदर पडलेल्या घराचे संबंधित अधिकारी व प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी.