एनईपीला राज्यातील विद्यापीठांचा खो..!
-कसे घेणार एकाच वर्षी दोन पदव्या.युजीसीच्या आदेशाला केराची टोपली,
नागपूर (Nagpur) :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) आणि मुक्त विद्यापीठ नव्या शैक्षणिक (Open University is a new academic) धोरणासह विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशालाच खो दाखवित आहे. एकाच वर्षी विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेण्याची मुभा दिली (Students are allowed to pursue two degrees in the same year) असताना दोन्ही विद्यापीठाचे पदव्युत्तर वेळापत्रक जवळपास सारखे(Postgraduate schedule almost same)असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेला मुकावे लागणार (Students will miss any exam) आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या कसे मिळणार हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) विद्यार्थ्यांना यापुढे एकाच वेळी दोन पदवींसाठी प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक ममिदला जगदीश कुमार (Chairman of the Commission Prof. Mamidla Jagdish Kumar) यांनी एप्रिल २०२२ रोजी माहिती दिली होती. २०२२-२३ या शैक्षणिक सत्रापासून (From the academic session 2022-23 )विद्यार्थ्यांना दोन पदवी कार्यक्रमांतर्गत एकाच वेळी दोन पदवींसाठी प्रवेश घेता येतो. विद्यार्थ्यांना ही पदवी वेगवेगळ्या दोन विद्यापीठातूनही पूर्ण करता येते. राज्यातील बहुतांश विद्यापीठाने तशी सुविधा सुरू केली आहे.
परंतू यावेळी विद्यापीठांनी लोकसभा निवडणुकीमुळे द्वितीय सत्र आणि चतुर्थ सत्राच्या परीक्षेतील तारखांचा घोळ (Mixture of 2nd Semester and 4th Semester Exam Dates) करून ठेवला आहे. नागपूर विद्यापीठाच्या द्वितीय सत्राचा एमएच्या (Second Semester MA) सर्व विषयांच्या परीक्षा या ३० मेपासून ते ५ जूनपर्यंत चालणार (The exam will be held from May 30 to June 5) आहे. तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Open University )एमए परीक्षा द्वितीय व चतुर्थ सत्राच्या परीक्षा २७ ते ३० मे रोजी (2nd and 4th semester exams on 27th to 30th May) होत आहे. त्यातही दोन्ही विद्यापीठाचे परीक्षेचा कालावधी हा दुपारी २.३० वाजेपासून आहे. त्यामुळे ३० मे रोजीचा पेपर विद्यार्थ्यांना कोणताही एक द्यावा लागणार आहे. एक पेपर दिला तर दुसर्या पेपरमध्ये विद्यार्थी गैरहजर राहण्याची शक्यता आहे.
वेळापत्रक काढताना कमीत कमी दोन्ही विद्यापीठातील तारखांचा घोळ होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असते. मात्र यशवंतराव चव्हाण आणि नागपूर विद्यापीठाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. ३० मे रोजीचा पेपर रद्द करून पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
बीकॉम व सीए फाउंडेशनच्या तारखांतही घोळ.
बीकॉम (B.Com) शिकत असलेले विद्यार्थी सीए या व्यावसायिक (CA professionals) परीक्षेची तयारी करीत असतात. बीकॉमची परीक्षा ८ मे २७ मे ( BCom Exam 8 May 27 May ) तर सीए इंटरमिडीएटच्या परीक्षा ३,५,९,११,१५,१७, मे (CA Intermediate Exams 3,5,9,11,15,17, May) रोजी तर फायनल परीक्षा २,४,८, १०,१४,१६ रोजी (Final exam on 2nd, 4th, 8th, 10th, 14th, 16th) होत आहे. मात्र, ८,११,१५ आणि १७ मे रोजी बीकॉम व सीएच्या परीक्षा (However, BCom and CA exams on May 8, 11, 15 and 17) एकाच वेळी होत असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहे.