मुंबई (HSC 12th Result ) : महाराष्ट्र राज्य मंडळाने (MSBSHSE) बारावीचा निकाल (12th Result) जाहीर झाला आहे. mahresult.nic.in आणि hscresult.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यावर्षी 12वीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रात 14,33,331 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,23,923 विद्यार्थी परीक्षेला बसले असून, 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी mahahsscboard.in, hscresult.mkcl.org आणि results.digilocker.gov.in वर भेट देऊन निकाल पाहू शकतात.
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2024: मार्कशीट कशी तपासायची?
1. निकाल पाहण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
2. मुख्यपृष्ठावर तुम्हाला “HSC परीक्षा फेब्रुवारी- 2024 निकाल” ची लिंक मिळेल. लिंक वर क्लिक करा.
3. लॉगिन तपशीलामध्ये तुम्हाला रोल नंबर आणि तुमच्या आईचे नाव टाकावे लागेल.
4. तुम्ही लॉगिन करताच, परिणाम तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
5. तुम्ही (12th Result) संदर्भासाठी निकाल डाउनलोड करू शकता.
महाराष्ट्र बारावी विज्ञान शाखेचा निकाल:
उपस्थित विद्यार्थी : 725077
उत्तीर्ण विद्यार्थीः 709314
उत्तीर्णतेची टक्केवारी : 97.82 टक्के
महिला उमेदवारांची उत्तीर्ण टक्केवारी : 98.27 टक्के
पुरुष उमेदवारांची उत्तीर्ण टक्केवारी : 97.43 टक्के
महाराष्ट्र बारावीचा वाणिज्य शाखेचा निकाल:
उपस्थित विद्यार्थी: 307878
उत्तीर्ण विद्यार्थी: 283818
उत्तीर्णतेची टक्केवारी : 92.18 टक्के
महिला उमेदवारांची उत्तीर्ण टक्केवारी : 94.79 टक्के
पुरुष उमेदवारांची उत्तीर्ण टक्केवारी :89.81
महाराष्ट्र बारावी कला शाखेचा निकाल:
उपस्थित विद्यार्थी : 351145
उत्तीर्ण विद्यार्थी: 301566
उत्तीर्णतेची टक्केवारी : 85.88 टक्के
महिला उमेदवारांची उत्तीर्णतेची टक्केवारी : 90.38 टक्के
पुरुष उमेदवारांची उत्तीर्णतेची टक्केवारी : 81.91 टक्के