बायोगॅस प्रकल्पाच्या मुद्यावरून वादंग
वसमत/हिंगोली (Purna Sugar Factory) : वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Purna Sugar Factory) शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला. यात आमदार राजू पाटील नवघरे व चेअरमन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे आमने-सामने आले होते. पंचवीस वर्षात दांडेगावकर यांना पहिल्यांदाच आमसभेत आव्हान उभे राहिले असल्याचे चित्र समोर आले. (Biogas project) बायोगॅस प्रकल्पावरून वादंग सुरू झाले.शेवटी चेअरमन दांडेगावकर यांनी सभा संपल्याचे जाहीर करून राष्ट्रगीताला न थांबता सभास्थळावरून निघून गेले त्यामुळे गोंधळात भर पडली.
२५ वर्षात पहिल्यांदाच दांडेगावकर यांच्या समोर उभे राहिले आव्हान
पुर्णा सहकारी साखर कारखान्याची (Purna Sugar Factory) वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वसमत मतदारसंघात जयप्रकाश दांडेगावकर व आमदार राजू पाटील नवघरे हे दोघे आमने सामने उभे राहणार असल्याने असल्याच्या पृष्ठभूमीवर ही सभा झाली. अपेक्षेप्रमाणे या सभेत तणावाचे वातावरण होते यावेळी सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बायोगॅस प्रकल्पावरून अनेक सभासदांनी हा प्रकल्प कारखान्याने करू नये आतापर्यंत कारखान्याने जेवढे प्रकल्प उभे केले त्यातून सभासदांना काही फायदा झाला नाही त्यामुळे हा प्रकल्प उभारू नये अशा सूचना केल्या तर काही सभासदांनी समर्थनात ही भूमिका म्हणून ठरवायचे समर्थन केले.
या मुद्यावरून वातावरण तापलेले असल्याचे पाहून चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांनी या ठरावावर सभासदांना हात उंचावून मतदान करा असे आवाहन केले हा ठराव मंजूर झाला असे चेअरमन दांडेगावकर यांनी जाहीर केल्याने गोंधळ वाढला आमदार राजू पाटील नवघरे हे व्यासपीठावर आले सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी ते आले असता चेअरमन दांडेगावकर यांनी नवघरे यांना विषयावरच बोला विषयावर बोलणार असेल तरच परवानगी आहे मी सभेचा अध्यक्ष आहे असे सांगितले. नवघरे यांनी विषयावर बोलणार आहे असे सांगितले मात्र नवघरे यांना बोलण्याची संधी न देताच सभेचे कामकाज संपले असे जाहीर करून दांडेगावकर सभास्थळावरून निघून गेले व गोंधळाला सुरुवात झाली सभा संपल्यानंतर राष्ट्रगीत घ्यावे लागते याचा विसर या गोंधळात दांडेगावकरांना पडला त्यावरून त्यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली.
राष्ट्रगीताला न थांबता सभेचे अध्यक्ष चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर निघून गेल्याचा आरोप यावेळी आमदार राजू पाटील नवघरे, भाजपच्या नेत्या उज्वलाताई तांभाळे व इतर सभासदांनी केला. (Biogas project) काँम्प्रेड बायोगॅस (ण्ँउ) प्रकल्प उभारुन सभासदांचे पैसे घेवुन त्या सभासदांना कुठलाही नफा भेटणार नसल्याचे अनेक सभासद या सभेत सांगत होते. पण त्यांना बोलण्यास मज्जाव करुन प्रकल्प लादण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी आमदार नवघरे व अनेक सभासदांनी केला पुर्णा सहकारी कारखाण्याचे सभासद असताना सुध्दा जवळा बाजार भागातील ऊस पुर्णा कारखान्यामध्ये गाळपासाठी आणला जात नाही. कपिश्वर या खाजगी कारखान्याला असू द्यावा लागत असल्याने सभासदाचे नुकसान होत आहे.
पूर्णा साखर कारखान्याचे (Purna Sugar Factory) अनेक प्रकल्प चालु आहेत. त्याचा लाभ सभासदांना होत नाही. तरी पुन्हा नवा प्रकल्प सभासदांच्या पैशातून कशासाठी करायचा असा आमचा सवाल होता असेही यावेळी आमदार नवघरे यांनी सांगितले. दाबून दडपून ठराव मंजूर करायचे असेल तर राजीनामे देऊन निवडणुका घ्या. तुम्हीही राजीनामा द्या, आम्हीही राजीनामा देतो मग सभासदांना निर्णय घेऊ द्या असेही यावेळी नवघरे यांनी सांगितले. या सभेत जयप्रकाश दांडेगावकर यांनी प्रास्ताविक करताना अहवालाचे वाचन करून विषय पत्रिकेवर असलेल्या ठरावावर सभासदांचे मत जाणून घेतले सभासदांनी ठराव मंजूर केले. मात्र (Biogas project) बायोगॅस प्रकल्पाच्या ठरावावरून ठिणगी पडली.
या सभेत आमदार राजू पाटील नवघरे व चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर हे आमने-सामने आल्याचे चित्र पहावयास मिळाले पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या आमसभेत गेल्या पंचवीस वर्षात चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांना कधी आव्हान उभे राहिले नव्हते संचालकातच दोन गट पडल्याने प्रखर विरोध समोर आला. विधानसभेच्या वातावरणाच्या पृष्ठभूमीवर ही सभा होणार असल्याने सभासदांनी या सभेसाठी प्रचंड गर्दी केली होती या सभेत दांडेगावकर व नवघरे काय भूमिका मांडतात याची उत्कंठा सभासदांना होती व शेवटी अपेक्षेप्रमाणे सभेत गोंधळ झाला. आता आगामी काळात काय निर्णय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारखान्याचे नव्हे तर संघर्षाचे बॉयलर पेटले
पुर्णा सहकारी साखर कारखान्यात (Purna Sugar Factory) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला घोषणाबाजी झाली कारखान्यात गाळप बॉयलर पेटवण्याच्या तयारी संदर्भात काही चर्चा तर झाली नाही मात्र दोन नेत्यांमधील संघर्षाचे बॉयलर मात्र आज पेटले असल्याचे समोर आले प्रश्न विचारणार्या सभासदांना दांडेगावकर यांनी कारखान्याच्या निवडणुकीतील प्रचारावरून डिवचण्याचा प्रयत्न करून टोमणे मारले तीन हजार रुपये भाव देतो म्हणणार्यांना मतदान दिले नाही २७ रुपये भाव देणार्यांना निवडून दिले असल्याचा टोला मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी केला त्यातूनही संतापाला चालना मिळाली.आजपर्यंत दांडेगावकर यांना कधीच संचालक मंडळातून जाहीर विरोध झाला नव्हता यावेळी मात्र संचालकात दोन गट पडल्याचे उघड झाले त्यामुळे हा प्रकार आगामी काळात चिघ्ाळणार यात शंका नाही वादग्रस्त ठराव मंजूर झाला असे दांडेगावकर यांचे म्हणणे आहे तर ठराव नामंजूर झाला असे विरोधकांचे म्हणणे आहे.आमदार नवघरे यांचे समर्थक प्रचंड संख्येने सभास्थळी उपस्थित होते दांडेगावकर यांना समर्थन देणार्यांची संख्याही भरपूर होती या निमित्ताने दोन्ही नेत्यांचे शक्ती प्रदर्शन झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही
