चंद्रपूर (Chandrapur) :- येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६१ लिपिक व ९७ शिपाई, अशा ३५८ पदांच्या भरतीसाठी ३१ हजार १५६ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज(Online application) केले आहेत. ही परीक्षा राज्यातील नऊ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर २१, २२ व २३ डिसेंबर रोजी होणार होती दरम्यान आज शनिवार दि.२१ डिसेंबरला सकाळी होणार पेपर सुरू झाला अन काही वेळातच परीक्षा रद्द झाल्याची घोषणा झाल्याने परीक्षार्थी निराश होऊन परीक्षा केंद्राबाहेर (Examination Centers) निघाले. आज रद्द झालेला पेपर 23 डिसेंम्बर ला होईल असे सांगण्यात येत असले तरी परीक्षेसाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणी गेलेल्याचे मोठे आर्थिक नुकसान(financial loss) झाले याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे .
सिडीसीसी बँकेच्या पदभरतीसाठी जाणार्यांची मोठी आर्थिक नुकसान
चंद्रपूर जिल्हा बँकेच्या पदभरतीसाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षेचे केंद्र नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व जालना या जिल्ह्यात असल्याने आधीच परीक्षार्थ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत असताना एनवेळेवर परीक्षा रद्द करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे .