शेतकऱ्यावर ओढवले संकट
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा () : सोयाबिन पिकावर हजारो रुपयांचा खर्च करून औषधाची फवारणी केली मात्र हूमनी अळीचा नायनाट झाला नाही आणि अळीने चक्क चार एकर मधील सोयाबिन पीक उध्दवस्त करूण टाकले. आता (Soybean Crop) सोयाबीनचे पीक हाती येणार नाही हे पाहून शेतकऱ्यांने चक्क शेतात जनावरे सोडून पिकामध्ये वखर घातला.
चिखली तालुका कृषी विभागा अंतर्गत मेरा खुर्द आणि मेरा बु महसूल मंडळात यावर्षी कपाशी पेक्षा सोयाबिन पेरा मोठया प्रमाणावर आहे. खरीब हंगामात शेतकऱ्यांनी घागडबडीने सोयाबिन पेरणी केली. मात्र सूरवातीला काही दिवस चांगला तर काझी दिवस पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतात जमिनीतून (Soybean Crop) सोयाबिन बियाणे उगवण्यास वेळ लागला तर काही शेतात चांगलें उगले होते त्यामुळे काही शेतकऱ्यावर दुबार पेरणी करावी लागली कसेबसे त्यातून बचावलेल्या पिकावर चांगलें उत्पन्न होईल आणि बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाची परतफेड करता येईल अशी अशा शेतकऱ्यांना लागून होती.
परंतु मेरा खुर्द येथील अनिल लक्ष्मण उदार यांच्याकडे गावालगत गट न ४८ मध्ये चार एकर जमिन आहे या जमिनीत त्यांनी यावर्षी सोयाबीनची लागवड केली होती . तसेच शेताशेजारी असलेल्या अमीन शहा यांचे शेत बटईने केले होते. मात्र ऐन सोयाबिन पिकाला शेंगा लागण्याच्या वेळेवरच अचानक सोयाबिन पिकावर हुमणी अळीने आक्रमण केले या अळीचा नायनाट करण्यासाठी महागड्या औषधी फवारणी केली तरी सुध्दा अळीवर काहीही फरक जाणवला नाही आणि उलट चार एकरातील संपुर्ण (Soybean Crop) सोयाबिन पिक उध्दवस्त करूण टाकले. यासाठी कृषि विभागाचे सहाय्यक यांना माहिती दिली मात्र त्यांनी कोणताही उपाय सांगितला नाही त्यामुळे आता सोयाबिन पिक हातात येत नाही म्हणून शेतकऱ्याने सोयाबिन पिकामध्ये जनावरे सोडून वखर घातला. त्यामुळे यावर्षी सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.