कोरेगाव,चोप (Gadchiroli) :- देसाईगंज तालुक्यातील चोप,कोरेगाव,बोडदा, शंकरपूर,कोकडी, तुळशी,उसेगाव,किन्हाळा व तालुक्यातील इतर गावात अचानक दहा तारखेला 24 तास झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी वाहू लागल्याने त्या क्षेत्रातील धान पिके पानाखाली बुडून राहिल्याने शेकडो हेक्टर धान पिकाचे नुकसान झालेले आहे.
देसाईगंज तालुक्यात काही दिवस पावसाने विश्रांती दिली
गडचिरोली जिल्हा सहित देसाईगंज तालुक्यात काही दिवस पावसाने विश्रांती दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना बर्याचशा अडचणींना सामोरे जावे लागले होते. तरी पण धान पीक जोमात होते तर बरेचसे धान पिकांचा निसवा होऊन लोंबेटाकले होते आणि अशातच अचानक दहा सप्टेंबरला पावसाने सुरुवात केली सततच्या 24 तास झालेल्या पावसाने (Rain)नदी नाले ओथंबून वाहू लागले त्यामुळे नदी नाल्या शेजारचे ध्यान पिके पाण्याखाली बुडाले अशातच गोशीखुर्दच्या धरणाचेपाणी केला सोडल्याने इतर नद्यांचा प्रवाहा संत झाल्याने शेतातील साचलेला पाणी निघायला उशीर झाला त्यामुळे फुटवे झालेले धानपिक व लोबांवरील लव गळून पडल्याने धन पानफोल होणार आहेत.
बऱ्याचशा शेतकऱ्यांचे धान वादळाने शेतात पडल्याने व बांधावर पाणी असल्यामुळे बरेचसे धान पीक पाण्यात बुडून सडले आहेत तर बऱ्याचश्या धान पिकावर पुराचे गाळ बसलेले पिके खराब झालेले आहेत असल्याने नदी नाल्या शेजारील प्रवाहाच्या क्षेत्रातील शेकडो हेक्टर धान पिके संकटात आले आहेत तरी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात ची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.