लातूर (Hunger strike) : आज अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड (AB Santuji Brigade) संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रदिपसिंह गंगणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत हुतात्मा स्मारकास अभिवादन करून विविध मागण्यांकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण (Hunger strike) सुरू करण्यात आले. हिंदू खाटीक समाजभूषण, महामानव, सत्यशोधक समाजाचे अग्रदुत डॉ.संतुजी रामजी लाड यांची ४ मार्च जयंती तर ८ ऑक्टोबर पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करण्यात यावी व तसेच डॉ. संतुजी रामजी लाड यांच्या नावे “आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्यात यावे.
महाराष्ट्रातील हिंदु खाटीक समाजाला विविध भागात विविध नावाने उदा. मराठा खाटीक, क्षत्रिय खाटीक, धनगर खाटीक, कलाल, खाटीक कलाल, बक्कर कसाब, लाड खाटीक, बक्कर खाटीक या नावाने ओळखले जाते. जे सर्व पिढ्यान पिढ्या लहान प्राण्यांचे मांस विक्रीवर उपजीविका भागविणारे एकमेकांचे रक्त-नातेवाईक खाटीक जातीचे असल्याची वस्तू स्थिती शासनाने स्वीकारावी. डॉ.संतुजी रामजी लाड यांचे नावे समाज मंदिर, सांस्कृतिक सभागृह, समाज भवनसाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्यात यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे व मिटकॉन लि.मार्फत मटन व्यवसायिकांना चिकन, मटन, मासे फूड प्रोसेसिंगच्या माध्यमातून जोडधंदा उभारण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे, तसेच दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय निशुल्क क्षमता बुद्धी प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षण देणे.
शिवचित्रकार कलायोगी गोपाळराव बळवंतराव कांबळे कोल्हापूर यांना मरणोपरांत महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. (AB Santuji Brigade) महाराष्ट्र राज्यात मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एस सी प्रवर्गाचे अ ब क ड वर्गीकरण करणार असाल तर हिंदू खाटीक जातीसाठी स्वतंत्र ५% टक्के आरक्षण आरक्षित ठेवण्यात यावे, यांसह अनेक मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले.
या (Hunger strike) उपोषणात ॲड. अमितकुमार कोथमिरे सोलापूर, सुनिलकुमार कांबळे छत्रपती संभाजी नगर, संजयकुमार साबणे नांदेड, बालाजी बिनवडकर, डॉ. रावसाहेब खिरडकर जातेगाव नाशिक, पत्रकार साईनाथ घोणे, दिगंबर कांबळे लातूर, अमोल फिसके देवणार मुंबई, योगेश डोंगरे, महेश विजापूरे, इंद्रजित गंगणे, चंद्रकांत आबा थोरात, सुरेश थोरात पुणे, सूरज कांबळे आदींनी सहभाग नोंदविला आहे