देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Hunger strike) : जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही विचारपूस न करता शेतात नाला खोदुन व मोठ मोठी झाडे तोडले आणि शेतातील उभ्या पिकाचे आतोनात नुकसान केले होते. या संदर्भात मनूबाई येथील वयोवृध्द महिलेने दे राजा येथे जलसंधारण विभागाच्या समोर आमरण उपोषण (Hunger strike) सुरू केले होते. या आमरण उपोषणाची बातमी दै देशोन्नती मध्ये प्रकाशित करण्यात आली बातमी प्रकाशित होताच तात्काळ माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, उपविभागीय अधिकारी व्ही पी लाकडे तसेच विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दखल घेवून अखेर लेखी आश्वासने आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
चिखली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मनुबाई येथील सरपंच सौ अर्चना संदीप वायाळ यांच्या सासू विमल विनायक वायाळ यांचे मनूबाई गावालगत असलेल्या खडका शिवारात गट नं. २ मध्ये ३ हे. ४६ आर जमिन आहे. या जमिनी मध्ये उपविभागिय जलसंधारण अधिकारी उपविभाग दे. राजा यांनी कोणतीही प्रकारची परवानगी न घेता शेतात २५ फुट रुंद व ५० फुट लांब अशा जमिनी मध्ये सिमेंट बंधाऱ्याचे खोदकाम करूण नाला सरळीकरण केले तसेच जागेवरील ५ जांभळीचे तोडून नाहीसे केले. या बाबत उपविभागिय अधिकारी जलसंधारण दे. राजा या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यानी झाडे तोडल्याचे कबुल केले होते.
मात्र नुकसान भरपाई दिली नाही त्यामुळे शेताची व झाडांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरपंच महिलेच्या वयोवृध्द सासूने गेल्या दोन दिवसा पासून जलसंधारण विभागाच्या कार्यालय दे राजा येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. या (Fasting to death) आमरण उपोषणाची बातमी दै. देशोन्नती मध्ये प्रकाशित करण्यात आली होती बातमी प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली आणि जलसंधारण विभागाचे झोपलेले अधिकारी खळबळून जागे झाले तसेच माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घरले, या वेळी भाजपा, राष्ट्रवादी आदी पक्षाच्या नेत्यांनी उपोषणाला भेट देवून अधिकाऱ्यांना विचारणा करत तात्काळ तोडगा काढा अन्यथा होणाऱ्या घटनेला सामोरे जा असे म्हणताच अधिकाऱ्यांनी आमरण उपोषणाला मंडपाला भेट देवून नुकसान भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासन देताच (Hunger strike) आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी उपविभागीय कार्यकारी अभियंता लाकडे, भाजप जिल्हापाध्यक्षा एकनाथ काकड , भाजपा कार्यकारणी अध्यक्ष सुनील वायाळ, भाजपा नेते डॉ सुनिल कायंदे ,राष्टवादी जिल्हा उपाध्यक्षा गजानन वायाळ, ता .अध्यक्ष राजेश इंगळे , सरपंच पती संदीप वायाळ, उपसरपंच लिबांजी शिंदेशिवानंद शिंदे , ग्रा.प.सदस्य अप्पा डोंगरदिवे, कैलाश वायाळ , अलका गिरी, सुनीता वायाळ, अश्विनी वायाळ , सविता सवडतकर, व गावातील मनोज वायाळ, सुरेश वायाळ, गजानन सवडतकर,उध्दव सवडतकर , सुनिल वायाळ,आदींची उपस्थिती होती .