रिसोड (Hunger strike) : येथील नगरपरिषद समोर बळीराम गायकवाड यांनी 3 डिसेंबर 2024 च्या सायंकाळी 6 वाजेपासून अमरण उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. संबंधित विभागाने आमरण उपोषणाची दखल न घेतल्याने रिसोड येथील पत्रकार सतीश चोपडे यांनी संबंधित प्रशासनाच्या निषेधार्थ व बळीराम गायकवाड यांच्या समर्थनात (Hunger strike) आज सहा डिसेंबर 2024 च्या दुपारी तीन वाजेपासून रिसोड नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
रिसोड येथील नगर परिषदेचे कर्मचारी जहीर खा अजमत खा या कर्मचाऱ्यांची वर्णी विद्युत विभागात वायरमन पदावर असून त्यांना जाणीवपूर्वक लेखापरीक्षक विभागात पदोन्नतीवर दिल्याने त्यांना मूळ पदावर कायम करावे या प्रमुख मागणीसाठी रिसोड येथील समाजसेवक बळीराम गायकवाड यांनी 3 डिसेंबर 2024 च्या सायंकाळी 6 वाजेपासून रिसोड येथील नगरपरिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या (Hunger strike) अमरन उपोषणाचा चौथा दिवस असूनही संबंधित विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अमरण उपोषण मंडपाला साधी भेट सुद्धा दिली नाही.
अमरण उपोषणकर्त्याची साधी चौकशी सुद्धा केली नसल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ व कुपोषणकर्त्याच्या समर्थनात रिसोड येथील पत्रकार सतीश चोपडे यांनी उपोषण सुरू केले आहे. बळीराम गायकवाड यांच्या (Hunger strike) अमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली असून त्यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहे. संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक अमरण उपोषणाकडे दुर्लक्ष करीत असून उपोषणकर्त्याच्या जीवत्वास कमी जास्त झाल्यास सर्वस्वी संबंधित विभाग जबाबदार राहील असा आरोप सतीश चोपडे यांनी केला आहे.