दखल नाही घेतल्यास बेमुदत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
परभणी/गंगाखेड (Gangakhed Hunger strike) : गंगाखेड शुगर प्रशासन व चेअरमन आ. रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात (Gangakhed Tehsil Office) गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या वयोवृद्ध उपोषणार्थीच्या समर्थनार्थ दि. २६ ऑगस्ट सोमवार रोजी मोर्चा काढण्यात आला. या उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल नाही, घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
गंगाखेड शुगर प्रशासन व चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी शेतकरी, ऊस वाहतूक ठेकेदारांच्या नावाने परस्पर कर्ज उचलल्यानंतर गंगाखेड तालुक्यातील वयोवृध्द ऊस वाहतूक ठेकेदार भगवान रोहिदास भोसले यांना बँकेकडून वसुलीची नोटीस आल्यामुळे त्यांनी दि. २० ऑगस्ट रोजी पासून गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दि. २६ ऑगस्ट सोमवार रोजी या (Gangakhed Hunger strike) उपोषणाला सात दिवस झाले तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोमवार रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत ऊस वाहतूक ठेकेदार व शेतकरी बांधवांनी मोर्चा काढून नायब तहसीलदार मो. अजीम यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
दिवाळखोर गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जी साखर कारखाना कर्ज प्रकरणी भगवानराव भोसले यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास ७ दिवस झाल्यामुळे दिवसेंदिवस उपोषणार्थींची प्रकृती ढासळत आहे. या Gangakhed Hunger strike आमरण उपोषणाची दखल घेउन गंगाखेड शुगर्सने परस्पर उचललेल्या कर्जामुळे आणि थकीत कर्जापोटी हजारो शेतकऱ्यांच्या सिबीलवर बोजा पडला आहे. गंगाखेड शुगर्स कर्ज प्रकरणी बाधीत शेतकऱ्यांचा सातबारा व सिबील बोजा कोरा करावा. ऊसतोडणी वाहतूकदार व ठेकेदारांची देणी तात्काळ अदा करावी.
गंगाखेड शुगर्स साखर कारखाना दिवाळखोरी प्रकरणी शेतकरी, ऊसतोडणी वाहतूकदार, ठेकेदार व कामगारांच्या वतीने राज्य सरकारने न्यायालयीन हस्तक्षेप करावा व फसवणूक, दिवाळखोरी आदी सारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना सर्वच राजकीय पक्षानी निवडणुकीत उमेदवारी न देता. शिव- फुले- शाहु- आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपावा आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर भाई गोपीनाथ भोसले, मा. जि.प. सदस्य भगवान सानप, श्रीकांत भोसले, कॉ ओंकार पवार, कॉ. शिवाजी कदम, प्रमोद मस्के, कॉ. योगेश फड, मितेश सुक्रे, सतिश शिंदे, दत्तराव भोसले, काशिनाथ शिंदे, परसराम मकापल्ले, विष्णुकांत शिंदे आदींसह असंख्य शेतकरी, ऊस वाहतूक ठेकेदार यांची उपस्थिती होती.
इंग्रज परवडतील मात्र गुट्टे नाही
गंगाखेड विधानसभा मतदार संघात सध्या सुरू असलेल्या घडामोडी अत्यंत चुकीच्या पद्धतीने घडत असून प्रत्येक शासकीय कार्यालयातील कामे विद्यमान आमदारांच्या इशाऱ्यावर होत असल्याने व शेतकऱ्यांना माहिती नसतांना हजारो शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर पैसे उचलले या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ७६ वर्षीय वयोवृध्द ऊस वाहतूक ठेकेदार भगवान भोसले हे (Gangakhed Hunger strike) उपोषणास बसले असताना ही केवळ आमदारामुळे प्रशासनाने याची दखल घेतली नाही असे म्हणत एकदाचे इंग्रज परवडतील मात्र आ. गुट्टे परवडणार नाही. गुट्टे पेक्षा तालिबानी बरे म्हणण्याची वेळ गंगाखेड मतदार संघातील मतदारांवर आल्याचे यावेळी बोलतांना मा. जि. प. सदस्य भगवान सानप यांनी सांगितले.
तात्काळ कारवाई नाही झाल्यास आमदाराला फिरू देणार नाही
गंगाखेड तहसील (Gangakhed Tehsil Office) कार्यालयासमोर आमरण उपोषणास (Gangakhed Hunger strike) बसलेल्या वयोवृद्ध इसमाच्या उपोषणाची तात्काळ दखल नाही घेतल्यास यापेक्षा मोठा मोर्चा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व आमदाराला मतदार संघात फिरू देणार नाही असा इशारा देत शेतकर, ऊस वाहतूक ठेकेदार यांना कर्जाच्या खाईत लोटणाऱ्या आमदाराला मतदार त्याची जागा नक्कीच दाखवतील असा विश्वास श्रीकांत भोसले यांनी व्यक्त केला.