अर्जुनी मोरगांव(Gondia):- अर्जुनी मोर तालुक्यातील राजीवनगर येथे दि.१ सप्टेंबर ला सकाळी ८.०० वाजेदरम्यान राजीवनगर येथील विशाल प्रभु शहारे यांचे राहते घरी वन्यप्राणी (wild animals) चितळाचे मास असल्याची गुप्त माहिती मिळताच अर्जुनी/मोर वनक्षेत्र क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांनी आपल्या ताफ्यासह मौकास्थळी धाड टाकून विशाल प्रभु शहारे राजीवनगर यांचे राहते घरातून वन्यप्राणी चितळाचे ४.५ कि.ग्रॅम मास हस्तगत केले.
आता पर्यंत एकुण चार आरोपी ताब्यात
अधिक तपास केले असता त्यांच्या कडून शिकार करण्याकरिता उपयोगात येणारे दोन नग लोखंडी सळई, दहा नग लोखंडी फासे असे अवजारे त्यांच्या कडून मिळाले आहे. विशाल प्रभु शहारे यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने मौजा बरडटोली (अर्जुनी/मोर) येथे असलेला त्याचा सोबती बलदेवसिंग धर्मेंद्रसिंग टाक, भोजराम बावणे व फरार आरोपी दुर्गेश बावणे यांच्या सोबत एकमत करुन वन्यप्राणी चितळ व रानडुक्कराची शिकार केली असल्याचे लक्षात आले. तेव्हा मौजा बरडटोली (अर्जुनी/मोर) येथे वास्तव्यास असलेल्या बलदेवसिंग टाक यांचे राहते घराची झडती घेतले असता वन्यप्राणी चितळाचे शिजविण्यात आलेली मास व वन्यप्राणी रानडुक्कराचे (wild boar) कच्चे मास त्याचे कडून मिळाले. शिवाय शिकारी करिता वापरण्यात आलेले दोन नग भरमार बंदुक जप्त करण्यात आले. वन्यप्राणी रानडुक्कर व चितळ यांच्या शिकार प्रकरणी वनगुन्हा क्र. ०४६०६/०२/२०२४ दि.१ सप्टेंबर २०२४ अन्वये जारी करण्यात आला असून आता पर्यंत एकुण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच पुढील तपासात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी संपुर्ण कार्यवाही ही गोंदिया उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई व नवेगांवबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी अविनास मेश्राम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पुढील तपास सचिन कटरे वनपरिक्षेत्र अधिकारी वनक्षेत्र अर्जुनी/मोर हे करीत आहेत. आणि या चारही आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार असल्याची माहिती आहे.