Pusad:- तालुक्यातील खंडाळा घाटातील सातघरी गावाच्या वळणावर टोयोटा वाहनाने माहूरगड येथे रेणुका मातेच्या दर्शनाकरिता आलेल्या नगर येथील एका कुटुंबाचा परतीच्या प्रवासामध्ये दि. 7 ऑक्टोंबर च्या पहाटे साडेचार वाजता च्या दरम्यान अंदाजे वाहन चालकाचा आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सदरील वाहन एका झाडाला विशाल आदळले या दुर्दैवी घटनेत पती-पत्नी जागीच ठार तर सहा जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे.
दुर्दैवी घटनेत पती-पत्नी जागीच ठार
त्या दुर्दैवी अपघातामध्ये नगर जिल्ह्यातील पत्नी सौ. मनीषा बबन गुळदगड वय 50 वर्ष रा. राहुरी अहमदनगर, तर पती बबन गुलदगड वय 60 वर्ष रा. राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्या व्यतिरिक्त त्या वाहनांमध्ये अत्यंत गंभीरित्या जखमी (Injured)झालेल्या सहा जणांना वाशिम (Washim)येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील त्यांनी स्वतः भरती केलं. पती पत्नी यांची मृतदेह(dead body) पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पोस्टमार्टम(Post mortem) करिता आणलेले आहेत. संबंधित अपघातामध्ये (accident) मृत व जखमी झालेल्या लोकांचे नातेवाईक अहमदनगर येथून पुसद कडे रवाना झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सकाळी साडेपाच वाजता दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी दीपक महाडिक हे स्वतः घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणलेत. खंडाळा फुरसुंगी ठाणेदार देविदास पाटील त्यासोबतच सातघरी येथील बीड जमदार गजानन राठोड व त्यांचे सहाय्यक पोलीस कॉन्स्टेबल पंजाब यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. या मृतदेहाचं विच्छेदन करण्यासाठी डॉ. मीनल बिरबल पवार (भेलोंडे) सक्षमपणे उभ्या टाकल्या आहेत हे विशेष.