चाकूरच्या बायपासवरील लातूररोड नजीकची दुर्घटना
देशोन्नती वृतसंकलन
लातूर (Trailer-Bike Accident) : चाकूर बायपासवर लातूर रोडनजीक चालत्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून मोटार सायकल धडकून एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर चाकूर बायपासवर लातूररोड नजीक उसाचा ट्रॅक्टर भरून जात होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या मोटार सायकल (क्रमांक एम एच 24/ एम 7709) वरून शनिवारी दुपारी सासरवाडीकडे जाणारे चेतन पंचाक्षरी मलकसमुद्रे व त्यांची पत्नी अश्विनी चेतन मलकसमुद्रे हे जात होते. यावेळी (Trailer-Bike Accident) समोर चालत असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून मोटार सायकल धडकल्याने चेतन पंचाक्षरी मलकसमुद्रे (वय 36 रा. कळवा वेस्ट ठाणे तालुका जिल्हा ठाणे) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी अश्विनी ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर लातूर येथील दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत.
दुर्घटनेची माहिती (Trailer-Bike Accident) चाकूर पोलिसांना कळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना लातूरला उपचारासाठी पाठवले. मयताच्या मृतदेहाची चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. याबाबत चाकूर पोलिसात रात्री गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया चालू होती.




