Yawatmal :- वाघाडी येथे न्ाुकतीची युवकाची निर्घुण हत्या (Murder) करण्यात आले तर रुई येथील पतीने पत्नीची हत्या केली. रुई येथीलआरोपी पती-राहुल श्रीराम डोंगरे हा आपल्या पत्नी वर संशय घेत असल्याने हिचे बाहेर अनैतिक संबंध (Immoral relationship) असल्याच्या कारणावरून सतत वाद घालायचा कालही हाच प्रकार झाला या दोघात रात्री कडाक्याचे भांडण झाले.
यातूनच राहूल याचा राग अनावर झाला आणि चक्क कुर्हाडीने मृतक पत्नी-मंदा राहुल डोंगरे रुई हिच्यावर घाव घालून तिला जागीच ठार केले. या घटनेने परिसर हादरून गेला मन हेलावणार्या घटनेने सर्व परिसरात हि घटना वार्या सारखी पसरल्याने लोकांची एकच गर्दी झाली होती. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार सुनील नाईक सपोनि मानकर नीरज पातूरकर, सचिन पातकमवार गजानन गोडंबे रुपेश नेवारे यांनी घटना स्थळी जाऊन आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.