वलांडी (Latur):- आम्ही जागृती शुगर व जिल्हा बँकेचा पारदर्शक कारभार करत असतानाही जाणीवपूर्वक दुष्ट पद्धतीनें खोटे नाटे आरोप केले. आमदारांनी स्वतः काहीही करायच नाही दुसरे कोणी चांगले करत असेल त्याला बदनाम करायचे असा उद्योग केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंखे यांना निवडून द्या, त्यांच्या कामाची गॅरंटी मी घेतो, असा शब्द रविवारी रात्री येथे झालेल्या जाहीर सभेत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिला.
पीकविमा देतो, अनुदान देतो, सर्व समाजाला आरक्षण देतो, अशी सर्व खोटे आश्वासन देऊन सर्वांची फसवणूक
देशमुख म्हणाले, राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने शेतकरी (Farmer)शेतमजूर सर्वसामान्य नागरिक यांचे वाटोळे केले. कुठलाही समाज या सरकार बद्दल खुश नाही. पीकविमा देतो, अनुदान देतो, सर्व समाजाला आरक्षण देतो, अशी सर्व खोटे आश्वासन देऊन लोकांना भुलथापा देवुन सर्वांची फसवणूक केली आहे. त्यामुळे ही योग्य वेळ आपल्याला आहे. आपण आपले बहुमूल्य अभय साळुंखे यांच्या पारड्यात टाकून त्यांना विजयी करा. एक मॉडेल मतदारसंघ म्हणून निलंगा मतदारसंघात विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख यांनी माझ्यासारखा शेतकऱ्याला तिकीट दिले. मला आशिर्वाद द्या. मी लोकांची प्रामाणिकपणे सेवा करेन, असे अभय साळुंके म्हणाले.