वाशिम (IAS Pooja Khedkar) : विविध कारणाने सध्या चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) या वाशिम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशिक्षण (IAS training) घेत आहेत. मात्र , त्यांच्यावर असलेल्या विविध आरोपांची चौकशी करण्यासाठी त्यांना मसुरी येथील (LBSNAA) लाल बहादुर शास्त्री नॅशनल अॅकॉडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशनने तात्काळ बोलविले आहे. त्यामुळे राज्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी १६ जुलै रोजी तात्काळ आदेश काढून त्यांची जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून (IAS training) मुक्तता केली आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांना २३ जुलैनंतर चौकशीसाठी मसुरी येथे पोहचावे लागणार आहे.
पूजा खेडकर यांनी मसुरी येथील (LBSNAA) लाल बहादुर शास्त्री नॅशनल अॅकॉडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशनमध्ये आयएएस प्रशिक्षण (IAS training) घेतले आहे. हे प्रशिक्षण घेत असतांना त्यांनी दाखल केलेले दृष्टीदोष ,क्रिमीनिअल दाखले बनावट असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मसुरी येथील अॅकॅडमीने त्यांना परत बोलविले आहे. अॅकॅडमीचे पत्र राज्य शासनास प्राप्त झाल्यामुळे राज्य शासनाने १६ जुलै रोजी तात्काळ आदेश जारी करुन (IAS Pooja Khedkar) पूजा खेडकर यांचा वाशिम येथे सुरु असलेला (IAS training) जिल्हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम स्थगित ठेवला आहे.
Maharashtra: Trainee IAS officer Puja Khedkar relieved from District Training Program of State Government of Maharashtra.
The letter from Nitin Gadre, Additional Chief Secretary (P) reads, "…LBSNAA, Mussoorie has decided to keep your District Training Program on hold and… pic.twitter.com/IHXw8ZOhmw
— ANI (@ANI) July 16, 2024