अर्जुनी/मोरगाव (Gondia) :- काँग्रेस पक्षामध्ये (Congress party) राहून तीन वर्षापासून केलेले दमदार कार्यआणि कार्यकुशल नेतृत्व असलेले अनिल सुखदेव कुमार दहीवले यांनी दिनांक 19/07/24 पासून सततच्या पावसामुळे (Rain)निर्माण झालेल्या क्षेत्रातील पूर परिस्थितीची पाहणी करून गावा गावात घर व शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना व ज्यांच्या घराचे नुकसान होऊन राहण्याचा निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला व घरातील अन्न कपडे त्यांची नासाडी झाली अशांना अनिल दहिवले यांनी मदत केली. अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रामध्ये गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे कार्यकर्त्यांना अडचणी समजून मदत करणे गरजूना शिक्षणासाठी मदत करणे महिलांसाठी मेळावे घेऊन महिलांना उद्योग करून त्यांची विकासासाठी वाटचाल यासाठी महिला मेळावे घेतले.
पूर पावसाच्या नुकसानीबाबत शासन व प्रशासन किती गाढ झोपेत असल्याचे पत्रकारांच्या निदर्शनात आणून दिले
अर्जुनी/मोरगाव विधानसभेच्या (Assembly) गेल्या पंधरा वर्षांपासून राखीव असलेल्या मतदार संघाच्या विकासाबाबत व विकासा करिता आज पर्यंत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी काय केलं? याबाबद अनिल दहीवले यांनी विधानसभा क्षेत्रा बाबत अनेक समस्यांचा पाढा पत्रकारांजवळ वाचला. त्यात प्रामुख्याने अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 19 जुलै पासून सतत पाऊस पडत असल्यामुळे झालेल्या पूर पावसाच्या नुकसानीबाबत शासन व प्रशासन किती गाढ झोपेत असल्याचे पत्रकारांच्या निदर्शनात आणून दिले. त्यात प्रामुख्याने अनेक शेतकऱ्यांची (Farmers)शेती अधिक पाऊसामुळे पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांवर दुबार रोवणीची वेळ आली.अशा हालाखीच्या परिस्थित शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. परंतु शासनाकडून अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही.
बेरोजगारांना रोजगाराची संधी
पूर (Flood) परिस्थितीमुळे सततच्या पावसाने अनेकांची घरे पडलेली आहेत.आणि पडत आहेत. बेघर झाले तेही मदतीपासून वंचित आहेत. याकडे अजून पर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याचे दिसून नाही. त्याचप्रमाणे अर्जुनी/मोरगाव विधानसभा मध्ये इटियाडोह धारण निसर्गाच्या वनसंपदेने सज्जलेल नवेगाव/ बांध हे महाराष्ट्राच्या नकाशावर राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित असून सुद्धा, याकडे गेल्या पंधरा वर्षापासून दुर्लक्ष केलेले आहे. लोकप्रतिनिधींनी पर्यटनाला चालना दिली असती तर गोठणगाव, नवेगाव/बांध, अर्जुनी/मोरगाव परिसरातील अनेक बेरोजगारांना (unemployed) रोजगाराची संधी प्राप्त झाली असती. एकंदरीत याकडे निवडून आलेले जनप्रतिनिधींची पाठ फिरवली असे जनतेचे मत आहे. त्यामुळे या विधानसभेतील अनेक आरोग्याच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या रोजगारांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. मागील पंधरा वर्षापासून मी अर्जुनी/मोरगाव विधानसभेमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यांने जनतेची सेवा युवक युवतींना रोजगाराची संधी प्राप्त होइल म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्य आदिवासी-गैरआदीवासी च्या मुला मुलींना शिक्षणा साठी शाळा काढली.
शिक्षण घेऊन गरिबांच्या मुला-मुलींना रोजगार मिळेल
शिक्षण घेऊन गरिबांच्या मुला-मुलींना रोजगार (Employment) मिळेल. त्या अनेक मुली माझ्याकडून जे शक्य होते त्याचे प्रयत्नकरून मागील पंधरा वर्षांपासून या परिसरामध्ये मदतकार्य व सामाजिक सेवा करीत आहे. तसेच कोरोना (Corona)महामारीच्या काळात शुद्धा नागरिकांना मदत करुन त्यांचे जीव वाचविले आहे.त्यामुळे येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीचा विचार करता अर्जुनी/मोरगाव विधानसभेच्या जनतेने एक जनमानस तयार केलेला आहे की,”विकास हवा तर, चेहरा नवा”या आशियाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून या विधानसभेच्या विकासाकरिता प्रयत्न करीत आहे.
आपण सत्तेत जाणार नाही तोपर्यंत आपल्या परिसराचा विकास करता येणार नाही
डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)यांच्या म्हणण्याप्रमाणे” जोपर्यंत आपण सत्तेत जाणार नाही तोपर्यंत आपल्या परिसराचा विकास करता येणार नाही”म्हणून जनतेच्या आशीर्वादाने जर मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची (National Congress Party) उमेदवारी मिळाल्यास मी अर्जुनी/मोरगाव विधानसभेची निवडणूक लढविणार व जिंकून येणार व नक्कीच या विधानसभेच्या विकासासाठी मी जनतेच्या आशीर्वादाने अहोरात्र प्रयत्न करून अर्जुनी/मोरगाव विधानसभेचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. जरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी पण बहुजनांचे नेते कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister) बनविण्याकरिता व पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता, पक्ष वाढविण्याकरिता पक्ष हित जोपासुन अहोरात्र कार्य करीत राहीन असे मत कॉंग्रेस नेते अनिल सुखदेव कुमार दहीवले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market)समिती अर्जुनी मोर यांनी पत्रकार कडे व्यक्त केली.