शेतकऱ्यांचे राज्य स्थापन करायचे असेल तर सत्ताबदल करणे गरजेचे.! शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचे मतदारांना आवाहन.
अचलपूर (Amravati) :- ७२ हजार कोटींची कर्जमाफी देणारे डॉ. मनमोहनसिंग (Dr. Manmohan Singh) यांचे कार्य अत्यंत भूषणावह असल्याचे प्रतिपादन दै. ‘देशोन्नती’ चे मुख्य संपादक (Editor-in-Chief of Deshonnati’) तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे ( Farmer leader Prakash Pohre ) यांनी केले. परतवाडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे (Mahavikas Aghadi candidate Balwant Wankhade )
यांच्या प्रचाराकरिता आलेल्या खा. राहुल गांधी (MP.Rahul Gandhi यांच्या सभेमध्ये लाखो लोकांच्या समुदायापुढे ते बोलत होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग ( Prime Minister Manmohan Singh ) शेतकऱ्यांप्रती कसे संवेदनशील होते, याबाबत स्वानुभव कथन करताना पोहरे पुढे म्हणाले, दै. ‘देशोन्नती’मध्ये शेतकरी आत्महत्यांबाबत सातत्याने लिखाण करीत असताना प्रधानमंत्री कार्यालयामधून फोन आला. शेतकरी आत्महत्या हा विषय समजून घ्यायचा
आहे, तुम्ही येऊ शकाल का, अशी विचारणा करण्यात आली. तुम्हाला चर्चेसाठी ४० मिनिटांचा वेळ देण्यात येईल. तुमच्या सोबत अजून कुणाची उपस्थिती लागेल, अशीही विचारणा करण्यात आली. तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार, (Agriculture Minister Sharad Pawar) अर्थमंत्री आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष (Chairman of Planning Commission) सोबत राहतील, असे मी सांगितले. मोहन धारिया (Mohan Dharia ) यांच्यासोबत मी दिल्ली येथे पोहोचलो. ४० मिनिटांऐवजी २ तास ४० मिनिटेपर्यंत माझे प्रेझेंटेशन झाले. हा विषय त्यांनी अत्यंत गांभीर्यपूर्वक ऐकून घेतला. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग ( Dr. Manmohan Singh) विदर्भात वायफळ या गावी मोहन धारिया यांच्यासोबत फिरून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ५ एकरापर्यंत बिनासही, बिनाअर्ज शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ केले. ( Arrears of farmers waived off without application.) कर्जाच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त करणारे डॉ. मनमोहन सिंग(Dr. Manmohan Singh)
आणि नरेंद्र मोदी ( Narendra Modi) या दोघांच्या शेतीविषयक धोरणांबाबत तुलनात्मक मीमांसा करताना पोहरे पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षाच्या काळात उत्पादन खर्च वाढला ( Production cost increased during 10 years ) आणि शेतीमालाचे भाव घसरले. १२ हजार रुपये क्विंटल खपणारा कापूस (Cotton) आज ६ हजार, तर १० हजार रुपये खपणारे सोयाबीन (soybeans ) आज २७४ हजार रु. प्रति क्विंटल आहे. त्यामुळे संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे.(Farmer suicides are increasing all over the country.) त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आणायचे असेल तर सत्ताबदल होणे गरजेचे आहे, असेही पोहरे म्हणाले. बळवंत वानखडे (Balwant Wankhade ) यांची प्रशंसा करताना पोहरे पुढे म्हणाले, आपणाला हायफाय माणूस नको, तर बळवंत वानखडे यांच्यासारखा शेतकऱ्यांचे प्रश्न ( सोडविणारा जमिनीवरचा माणूस हवा आहे. बळवंत वानखडे यांनी अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे बळवंत वानखडे यांना समर्थन देण्यासाठी मी आलो असल्याचे पोहरे म्हणाले. या देशात शेतकऱ्यांचे राज्य पुन्हा स्थापन करून (We will re-establish the kingdom of farmers in the country) शेतमालाला योग्य भाव पाहिजे असेल आणि शेतकऱ्याच्या घरी सुख- समृद्धी आणायची असेल, तर सत्ता बदल करणे गरजेचे आहे, असेही पोहरे म्हणाले.