रेणापूर /जिल्हा लातूर (Latur):- महाराष्ट्र शासनाने सर्व विद्यार्थी पहिल्याच दिवशी नव्या गणवेशात, सॉक्स बुट आणि पाठ्य पुस्तकासह शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे शैक्षणिक वर्षे २०२४-२५ साठी शनिवारी १५ जून पासून प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या. तालुक्यात ईयत्ता पहीलीच्या वर्गात १३०४ विद्यार्थाना प्रवेश देऊन मोठ्या उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. परंतु शासनाच्या घोषनेचा मात्र पुरता बोजवारा उडाला असुन आज शाळा सुरु होऊन २१ दिवस उलटले तरी विद्यार्थी रेणापुर तालुक्यातील ११० शाळेतील ७४८३ विद्यार्थी गेल्या वर्षीचाच जुनाच गणवेश धुवुन वापरत आहेत. तर नवीन पुस्तके दिलीत पण नवीन गणवेशाचे(New uniforms) काय आणि नविन बुट- सॉक्सच काय ? अशी पालकांतुन विचारणा होत आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी मोठा गाजावाजा करत प्रवेश उत्सव साजरा
शाळेच्या पहिल्या दिवशी मोठा गाजावाजा करत प्रवेश उत्सव (celebration) साजरा करण्यात आला.अनेक गावातून बैलगाडीतून(bullock cart), ट्रॅक्टर मधुन, प्रभात फेरी(morning round) काडून उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी विद्यार्थांना (Students) शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून पहिल्या दिवशी शालेय पोषण आहार बरोबर गोड पदार्थ ही देण्यात आले.व प्रवेशाच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. ईयत्ता पहीली वर्गात विद्यार्थांना शाळेत प्रवेश देण्यात आला. तसेच शाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले. प्रतेक वर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी नविन गणवेश आणि पाठ्य पुस्तके वाटप केले जात होते परंतू यंदा माञ गणवेश वगळून पाठ्यपुस्तके(textbooks) वाटप करण्यात आले परंतू रेणापूर तालूक्यातील ११० जिल्हा परीषदेच्या शाळेतील ७४८३ विद्यार्थी शालेय गणवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
विद्यार्थांना एक बुट आणि दोन पायमोजे लागलीच दिले जाणार
रेणापूर तालुक्यातील ११० जिल्हा परिषदेच्या शाळा आसून गणवेश पाञ विद्यार्थी ७४८३ आहेत.यांना एक गणवेश स्काऊट गाईडचा आणि एक शाळेचा नियमीत गणवेश आसे दोन गणवेश मिळणार आहेत. याला किती दिवस लागतील हे सांगता येत नाही परंतू सद्या प्रतेक विद्यार्थांना एक बुट आणि दोन पायमोजे लागलीच दिले जाणार आहेत. याचे बजेट आले आहे.परंतू गणवेश कधी येतील हे अद्याप स्पष्ट नाही.
विद्यार्थ्यांना गतवर्षीच्या गणवेशातच यंदा शाळेत दाखल व्हावे लागले
रेणापूर तालूक्यात खरोळा, पानगाव, रेणापूर, दर्जिबोरगाव, पोहरेगाव, कारेपुर, खलंग्री, कामखेडा हे आठ केंद्र असून यंदा रेणापूर तालूक्यातील १६३ शाळेतून ११२७७ एवढे विद्यार्थी शिक्षण (Education) घेत आहेत.यामध्ये जिल्हा परीषदेच्या ११० शाळा असून जिल्हा परीषदेच्या विद्यार्थ्यांना गतवर्षीच्या गणवेशातच यंदा शाळेत दाखल व्हावे लागले. शाळा सुरु होऊन आज जवळपास आठरा दिवस उलटून गेले असताना देखील अद्यापही विद्यार्थांना नविन गणवेश न मिळाल्यामुळे रेणापूर तालूक्यातील जिल्हा परिषदेच्या ११० शाळेतील ७४८३विद्यार्थी नविन गणेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
“जुना गणवेश धुवायला तर नवा गणवेश शिवायला “
दैनिक देशोन्नतीच्या(Dainik Deshonnati) प्रतिनिधीनीं जि.प.परिषदेच्या एका शाळेत जावुन गणवेश नसलेल्या विदयार्थ्यांशी नविन गणवेश,नवीन बुट सॉक्स आणि नविन पुस्तका बाबत विचारले असता नविन पुस्तके दिलेत,सॉक्स-बुट देतोत म्हणतात.
आणि गणवेशाबाबत विचारले असता. “गेल्या वर्षीचा जुना गणवेश धुवायला टाकला आहे आणि नवा गणवेश सर म्हणतात शिवायला टाकला आहे “