गावातील अवैध दारू विक्रीने सुखी संसाराचे वाटोळे!
रिसोड (Illegal Alcohol) : तालुक्यातील कु-हा येथिल मजुर वर्गातील महिला शेती मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकतात. परंतु गावातील तीन इसम अवैध रित्या दारू विक्री करतात.महिला वर्ग मजुरीला गेल्या नंतर कुटुंबातील लहाण-मोठे व्यक्ती घरातील मिळेल त्या वस्तु,अन्नधान्य विक्री करून दारू पितात.पर्यायाने अनेक कुटुंबातील दररोजच्या भांडण तंट्यांना कंटाळुन आज ता.1 ऑगस्ट ला सायंकाळी 6 वाजता शेकडो महिलांनी रोद्ररूपाने रिसोड पोलिस स्टेशन ला दारू बंदी साठी धडक दिली.
महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या व्यथा मांडल्या!
कु-हा गावातील दारू बंद करा दारूमुळे होणाऱ्या रोजच्या किटकिटी,भांडण,तंटे व व्यर्थ खर्च,यामुळे गावातील महिला ह्या वैतागलेल्या आहे.दारूमुळे अल्पवयीन मुले सुद्धा नशेच्या आहारी जात आहेत.यामुळे महिलांच्या अभ्यासावर परिणाम होत असुन त्यांच्या भविष्याचा परिणाम बद्दल पालकांना चिंता आहे.या दारूमुळेच अनेक संसार उध्वस्त होऊन अनेक संसार उध्वस्तीच्या मार्गावर आहेत. महिलांनी आपली दैनंदिन कामे करायची व रात्री दारूमुळे घरातील माणसाच्या किटकिटी ऐकायच्या या सर्व बाबीला कंटाळून रिसोड तालुक्यातील कुऱ्हा येथील महिला दिनांक एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी रिसोड पोलीस स्टेशनला धडकल्या.या ठिकाणी ठाणेदार व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावातील दारू बंद करण्यासंदर्भात मागणी केली.या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या व गावातील दारूमुळे दूषित होत असलेल्या वातावरणाबद्दल माहिती दिली. याव्यतिरिक्त गावात कोण कोण दारू विकत आहे.याबद्दलही महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले.रिसोड तालुक्यातील कुऱ्हा येथे दारू चा अक्षरशः महापुर आल्या असल्याचे महिलांनी सांगितले.या ठिकाणी बिनधास्तपणे अवैध दारू विक्रेते हे विक्री करत असुन कोणाचीही ऐकण्याच्या मनस्थितीत ते नाही व त्यांचे मनोबल खूप वाढले असल्याचे कुऱ्हा येथील महिलांचे म्हणणे आहे.आपली व्यथा मांडण्यासाठी रिसोड पोलीस स्टेशनला आलेल्या महिलांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली व लवकरच गावात येऊन अवैध दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करणार असे सांगितले. यावेळी कुऱ्हा येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दारूमुळे होणारे दुष्परिणाम बघता ग्रामसभेत ठराव!
भारत देविदास नागरे (सरपंच कु-हा)= गावातील अवैध दारू विक्रीचा विषय अत्यंत गंभीर असुन याचा महिला व मुलांवर परिणाम होत आहे. दारूमुळे होणारे दुष्परिणाम बघता ग्रामसभेत ठराव घेऊन सदर दारूबंदीचा प्रस्ताव पास करू व गावातील दारू कायमचीच बंद करू