आखाडा बाळापूर/हिंगोली (illegal animal Crime) : रविवारी रात्री महामार्गावर एकाच वाहनात म्हैशीचे १४ रेडे कोंबून (illegal animal) अवैध जनावरांची वाहतूक करताना पोलिस पथकाने वाहन पडून २० लाख ८० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोघाविरूद्ध (Akhara Balapur Police) आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडे दहा वाजता पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, मधुकर नागरे, शिवाजी पवार, राजीव जाधव, वाढोणकर, पिराजी बेले, प्रवीण चव्हाण पोलिस पथक गस्त करीत असताना महामार्गावर बाळापूर उड्डाणपूल भागात आयशर वाहन तपासणी केली असता त्यात १४ रेडे निर्दयपणे त्यांना दुखापत होईल अशा पद्धतीने कोंबून जनावांची वाहतूक परवाना नसताना अपुर्या जागेत (illegal animal) अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आल्याने (Akhara Balapur Police) पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्या फिर्यादीवरून शौकत शहा ईस्माईल शहा चालक रा. आसेगाव ता. मगरूळपिर व शेख जावेद शेख सतार मदतनीस बागनपुरा वाशीम विरुद्ध गुन्हा दाखल करून वाहन व जनावरांसह २० लाख ८० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास रामदास ग्यादलवाड करत आहे.