परभणी (Parbhani) :- जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाभरात अवैध धंदे चालकांवर छापेमारी करत मोठ्या प्रमाणात दारु (alcohol) व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दारु व इतर साहित्य जप्त
ताडकळस पोलिसांनी ताडकळस ते पूर्णा रोडवर केलेल्या कारवाईत प्रदीप अंभोरे याच्या ताब्यातून १ हजार ५४० तसेच असोला येथे केलेल्या कारवाईत गणेश जाधव, कागदे १ हजार ८२० रुपयांची दारु जप्त केली. सोनपेठ येथे दहिखेड या ठिकाणी सोमेश्वर चव्हाण याच्याजवळून ८४० तसेच डिघोळ येथे बबन कराड याच्या ताब्यातून २१० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. सेलू पोलिसांनी केलेल्या कारवाईत संतोष केवारे याच्या ताब्यातून ९८० रुपयांची दारु पकडली. पूर्णा पोलिसांनी सिध्दार्थ नगर येथे केलेल्या कारवाईत अश्विन शिंदे याच्या जवळून ९१० तर झिरो फाटा रोडवर केलेल्या कारवाईत प्रेमसिंग ठाकूर याच्या ताब्यातून २ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.