अवैध धंद्यावर छापे!
हिंगोली (Illegal Business Raids) : जिल्ह्यात अवैध धंद्यावर छापे मारून ९६ ठिकाणी केलेल्या कारवाईत १ लाख ९४ हजार ८४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध व्यवसाय विरोधी अभियान ५ राबविले जात आहे!
१ मे पासुन नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू केले आहे. १ सप्टेंबर पासुन अवैध व्यवसाय विरोधी अभियान ५ राबविले जात आहे. सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात १५ ते २१ सप्टेंबर दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी अवैध धंद्यावर छापे मारण्यात आले. ज्यामध्ये जिल्ह्यात ९६ ठिकाणी केलेल्या कारवाईत १ लाख ९४ हजार ८४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त (Confiscation of Goods) करण्यात आला. कोणत्याही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्यास नागरीकांनी नजीकचे पोलिस ठाणे किंवा पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या दिलेल्या संकेत स्थळावर किंवा ९१५०१००१०० या खबर हेल्प लाईनवर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.




