परभणी (Parbhani):- जिल्ह्यात व शहरात सुरू असलेले अवैध धंदे (Illegal business) बंद करावेत, अशी मागणी रिपब्लीकन सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप
सध्या शहरात खुलेआम पणे अवैध धंदे सुरू आहेत. यावर पोलिसांची कोणतीही वचक राहिलेली नाही. सदरा धंद्यांवर कारवाई (action) करुन आरोपींना ताब्यात घ्यावे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर निलेश डुमणे, राजकुमार सिंग टाक, अनिकेत उबाळे, अशिष वाकोडे यांच्या स्वाक्षर्या (signatures) आहेत.