वाशिम(Washim): ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वाशिम जिल्ह्यात आता अवैध धंद्याचे स्तोम माजतआहे. पोलीस विभागाच्या (Police Department)नाकर्तेपणातून जिल्ह्यास अवैध धंद्याचे ग्रहण लागत असून, पूर्वी चोरून लपून होत असलेले हे धंदे आता राजरोसपणे होऊ लागले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हाभरात उमटू लागली आहे.
दारू विक्रेत्यांनी आता नागरी वस्तीतच आपले अड्डे थाटले असल्याचे वास्तव
दोन-तीन दशकांपूर्वी वरली-मटक्याची (मोजकीच) खुराड तसेच देशी व गावठी दारू (alcohol) विक्रेत्यांचे अड्डे नागरी वस्ती सोडून गावकुसाबाहेर असायचे. मात्र, हल्ली ते थेट नागरी वस्ती पर्यंत पोहोचले आहेत. परिणामी, गोंधळ आणि कलहाचे वातावरण वाढीस लागत असून, सर्वसामान्य जनतेस मात्र त्रास(trouble) सहन करावा लागत आहे. शहरी भागात चौका- चौकात वरली-मटक्याचा कारभार करणाऱ्यांचे स्तोम दिसून येते. तर देशी व गावठी दारू विक्रेत्यांनी आता नागरी वस्तीतच आपले अड्डे थाटले असल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे. पोलीस विभागाचा पूर्वी जरब असे. वरली-मटकासह गावठी दारू विक्रीचे धंदे चोरून लपून केले जात असत. मात्र, हल्ली हे धंदे राजरोसपणे ते सुद्धा जोमात सुरू असल्याने पोलीस विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दारू विक्रीचा परवाना नसतानाही अवैध धंदे करणारे देशी दारूचे बॉक्स
शहरांसह ग्रामीण भागात अवैध धंदे (Illegal business)बोकाळले असून, दारू विक्रीचा परवाना(License) नसतानाही अवैध धंदे करणारे शहरांमधून देशी दारूचे बॉक्स बोलावितात. किंवा स्वतः आणून आपापल्या गावात बिन बोभाटपणे विकतात. या मार्गाने ते मोठी माया जमवीत असले तरी, ग्रामीण भागातील शांतता भंग होण्याचा धोका मात्र नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्हाभरातील वरली मटका, गावठी व अवैध मार्गाने करीत असलेल्या देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई करून जिल्ह्याचे जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
नियम बसविले जातात धाब्यावर
बार, देशी दारू विक्रीची दुकाने आणि धाबा चालकांना व्यवसायासाठी नियमावली आहे. विशिष्ट वेळेतच त्यांनी दुकान अथवा प्रतिष्ठान उघडणे व बंद करणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी नियमांना तिलांजली देऊन बार, देशी दारूची दुकाने आणि धाबे बेटाईम अव्याहतपणे सुरू राहत असल्याचे खेदजनक चित्र जिल्ह्यात आहे