चिखली (Buldhana):- वाळू माफियांवरील राजकीय वरदहस्त व त्यांच्या असलेल्या लागेबांध्यांमुळे अवैध वाळू माफियांनी मनमानी कारभार सुरू केला होता. त्यामध्ये मुरादपुर फाट्यालगत हायवे रोडवरच एका टिप्पर (Tipper) चालकाने रेती खाली करूण निघून गेला होता. मात्र या हायवे रोडवर पसरलेल्या रेती वरुण वाहने स्लीप होवून एक महिला तीन जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे हा वाळू माफियांचा प्रकार दै देशोन्नती न्युज पोर्टलने बातमी प्रकाशित करूण जनतेसमोर उघडकीस आनला होता. या बातमीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आणि तात्काळ तहसिलदार यांनी दखल घेवून हायवे रोडवरील पडलेला रेतीच्या ढिगाऱ्याची(Sand dunes) विल्हेवाट लावण्यात आली.
अखेर हायवे रोडवर पडलेला अवैध रेतीच्या ढिगाऱ्याची लावली विल्हेवाट
खडकपूर्णा नदी पात्रातील रेतीचा लीलाव स्थगित असल्याच्या नावाखाली वाळू माफिया (Sand Mafia) कडून नदी पात्रातून रात्रीला मोठया प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याने वाळू माफिया रेतीची विविध ठिकाणी रेतीची साठवणूक करुण ठेवत आहेत. तर गावोगावी रेतीची अवैध वाहतूक (Illegal transportation of sand) करुण बांधकाम करण्यासाठी अव्वाच्या सव्वा भावाने रेतीची विक्री केली जात आहे . त्यामुळे रात्रीला वाळू माफियांना दिवस उजाडत असल्याने रात्रभर टिप्पर चालक भरधाव वेगाने रेतीची वाहतूक करतात. अनेकवेळा सरपंच व ग्रामस्थ अवैध वाहतूक थांबवून संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून कळवितात परंतु वाळू माफियावर राजकीय व काही शासकिय अधिकाऱ्यांच्या लागेबांधयांमुळे त्यांच्यावर कारवाई (action)करण्यास अधिकारी कचरत होते. त्यातच वाळू माफिया गावातून भरधाव वेगाने वाहने चालविण्यातही मागे-पुढे पाहत नाहीत. या बाबतीत काही वेळा नागरिकांच्या ओरडण्यामुळे नाइलाजास्तव अधिकारी थातूर मातुर कारवाई करत असल्याने दिसून येत आहे त्यामुळे गेल्या काही वर्षां पासून वाळू माफियांची चांगलीच मुजोरी वाढली आणि या धंद्यात मिळणाऱ्या प्रचंड पैशामुळे ते अल्पावधीत श्रीमंतीची चव चाखत अनेक गैरप्रकार करत असत.
रोडवर पडलेल्या रेतीवरून वाहने स्लीप होवून अपघात होवू लागले
परंतु तीन दिवसापूर्वी रात्रीला एका टिप्पर चालकाचा अधिकारी पाठलाग करत असतांना वाहन चालकाने गाडी पकडणार म्हणून भरधाव वेगात गाडी चालून भर रोडवरच टिप्पर मधील अवैध रेती हायवे रोडवरील मुरादपुर फाट्या लगत रोडवर खाली करूण पसार झाला. त्यामुळे रोडवर पडलेल्या रेतीवरून वाहने स्लीप होवून अपघात होवू लागले आहे त्यांमध्ये झालेल्या अपघातात एका महिलेला आपला जीव गमावावा लागला तर तीन जण जखमी झाले या घटनेचा प्रकार दै देशोन्नती न्युज पोर्टल मध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली बातमी प्रकाशित होताच सर्वत्र मोठी खळबळ उडाली आणि तात्काळ तहसिलदार संतोष काकडे यांनी दखल घेवून हायवे रोडवरील रेतीच्या ढिगाऱ्याची लगेच विल्हेवाट लावावी. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला.