महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?
Parbhani:- तालुक्यातील धर्मापुरी शिवारात सध्या मुरूम व रेतीच्या अवैध चोरीला(Illegal theft of sand) उत आला आहे. दिवसाढवळ्या खुलेआम नदी-नाला काठावरून मुरूम व रेतीची तस्करी केली जात आहे. परंतु महसूल व पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे या माफियांचा जोर वाढतच चालला आहे. त्यामुळे आता या वाळू व मुरूम माफियांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
नाल्यावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा
धर्मापुरी येथील नाल्यावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. वाळू माफिया संगनमत करून या नाल्यातून रेतीचा व मुरुमाचा अवैध उपसा करीत असतानाही महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी धृतराष्ट्र बनल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाने काहीही कारवाई न केल्यामुळे रेती माफिया व मुरूम माफियांचा जोर वाढत आहे. धर्मापुरी शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी खुलेआम मुरुमाची तस्करी दिवसाढवळ्या, रात्री-बेरात्री सुरु आहे. परिसरातील पदाधिकारी मात्र दुर्लक्ष करीत असल्यानेच मुरुमाची अवैध वाहतूक (Illegal trafficking of acne) सुरू आहे. पण या वाहतुकीला आळा घालण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नाही. याचाच फायदा परिसरातील ट्रॅक्टरवाले खासगी कंत्राटदार मुरुमाची अवैध वाहतूक करीत आहेत. या सर्व बाबींना तहसील कार्यालयाचे अधिकारी जबाबदार आहे. त्यांचे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे प्रशासकीय कामात अनागोंदी कारभार सुरु दिसतो.
जेसीबीच्या साह्याने मुरूमाचे उत्खनन
मुरुमाचे अवैध उत्खनन धर्मापुरी परिसरात जेसीबी व मजुरांच्या सहकार्यातून केले जात आहे. मुरुम खोदकाम सुरूच असून सदर अवैध मुरुम ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावात आणल्या जात आहे प्रति ट्रॅक्टर ट्रॉली १६०० रुपयांचा दरही ठेवण्यात आला आहे. मुरूमाचे अवैध उत्खनन थांबवून अवैध वाहतूक तत्काळ बंद(Close immediately) करण्यात यावी, उत्खनन होण्याऱ्या स्थळांची पाहणी पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने करण्यात यावी व चौकशी करुन शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी सध्या जोर धरत आहे.