Risod :- रिसोड पोलीस स्टेशनच्या (Police station) डी. बी. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली ग्राम गोभणी येथे दोन ठिकाणी होत असलेल्या अवैध देशी-विदेशी दारू (Alcohol) विक्रीवर रेड कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीमध्ये श्रीधर मुरलीधर साबळे, हा त्याचे मालकीचे हॉटेल सुर्यावर अवैधरित्या विदेशी दारू व बियरची विक्री करतांना मिळून आल्याने त्याचे ताब्यातून १) KG STRONG कंपनीची बियर सिलबंद ४७ नग एकूण किं. ८,२२५/- रू. २) LONDON PILSNER कंपनीची बियर सिलबंद एकूण २३ नग एकूण किं. २३००/- रू. ३) Royal Challenge कंपनीचे सिलबंद १३ नग एकूण किं. २,४७०/- रू. ४) ROYAL STAG कंपनीचे सिलबंद ०९ नग एकूण किं. १,७१०/- रू., ५) MCDOWELL’S कंपनीचे सिलबंद २३ नग एकूण किं. ३,६८०/- रू. असा एकूण १८,३८५/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा (Crime) नोंद करण्यात आला.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद
गजानन अनंतराव गारडे, हा त्याचे मालकीचे हॉटेल अन्नपूर्णावर अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करतांना मिळून आल्याने त्याचे ताब्यातून १) ROYAL STAG कंपनीचे सिलबंद ०८ नग एकूण किं. १,५२०/-रू., २) देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीचे सिलबंद ०९ नग एकूण किं. ६३०/- रू. असा एकूण २,१५०/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
दत्तात्रय किसन चोपडे, रा. बेंदरवाडी व राहूल गणेश काळे हे त्यांचे मालकीचे हॉटेल जय सावतावर अवैधरित्या देशी दारूची विकी करतांना मिळून आल्याने त्याचे ताब्यातून देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीचे सिलबंद १६ नग एकूण किं. ११२०/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे (IPS), मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम श्री. नवदिप अग्रवाल (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वाखाली डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस हवालदार महादेव चव्हाण, अनिल राठोड, पोलीस अंमलदार रवि अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोणे यांनी केली आहे