अकोला (Illegal Saline raid) : शहरातील रणपिसे नगर परिसरात असलेल्या जीएमडी मार्केट येथे एका गोदामात सलाइनच्या साठ्याची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे साठवणूक केल्याची गोपनीय तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आली. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने सदर जीएमडी मार्वेâटमधील दास सर्जिकलच्या गोदामावर छापेमार कारवाई करून १ हजार ६४ सलाइनचे बॉक्स जप्त करून एकूण तब्बल ९ लाख २३ हजार रुपयांचा साठा हस्तगत केला आहे.
अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाकडे जीएमडी मार्केटमध्ये राज कटारिया यांच्या मालकीच्या असलेल्या एका गोदामात परवानगी नसताना सलाइनचा साठा साठवून त्याची रिटेलद्वारे विक्री करण्यात येत असल्याची तक्रार (Illegal Saline raid) सदर विभागाकडे केली होती. त्यावरून त्या ठिकाणी कारवाई करून तब्बल १ हजार ६४ सलाइनचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. तर या कारवाईत तब्बल ९ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दास सर्जिकलचे राज कटारिया यांची याबाबत अन्न व औषध प्रशासन पुढील चौकशी करणार असून, त्या अनुषंगाने त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे औषध निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे. (Illegal Saline raid) प्रसंगी न्यायालयातदेखील सदर प्रकरण दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. सदर कारवाई अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक गजानन घिरके, मनीष गोतमारे यांनी केली.
लायसन्सव्यतिरिक्त साठविला साठा!
सदर दास सर्जिकलचे कटारिया यांनी लायसन्सव्यतिरिक्त (Illegal Saline raid) सलाइनच्या साठ्याची साठवणूक केल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या या कारवाईत उघड झाले आहे. त्यानुसार यासंदर्भात सदर विभागाने पुढील चौकशी करून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
बेकायदेशीर विक्रीला बसणार लगाम!
अन्न व औषध प्रशासन विभागाने जीएमडी मार्केटयेथे एका गोदामात परवानगी अर्थात अतिरिक्त साठ्याची मान्यता नसताना तिथे (Illegal Saline raid) सलाइनच्या साठ्याची साठवणूक केली. यावरून सदर ठिकाणी कारवाई केल्याने बेकायदेशीरपणे सलाइन विक्री करणार्याला या कारवाईमुळे लगाम बसू शकतो अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
